स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी.
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी.
जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे यांच्या शुभहस्ते अखंड भारताचे जनक भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
प्रा.स्वाती बऱ्हाटे यांनी आपल्या मनोगतातून अखंड भारताच्या उभारणीसाठी, ५६० विविध संस्थानांच्या हिंदुस्थानच्या विलीनीकरणात लोहपुरुष सरदार पटेलांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी उपस्थितांना अवगत केले. देशाच्या सर्वांगीण विकास, प्रगतीसाठी दिलेले योगदान अभूतपूर्व असून समस्त भारतवासिय कायम त्यांच्या ऋणात राहतील असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत इंदिरा गांधी यांना देखील त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
समन्वयक प्रा.उमेश पाटील यांनी देशाच्या औद्योगिक प्रगतीत इंदिरा गांधींच्या योगदानाबद्दल माहिती देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.तसेच डॉ.अतुल इंगळे यांनी वंदेमातरम गीतास १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.संदीप वानखेडे यांनी केले. यावेळी डॉ अतुल इंगळे,प्रा.गणेश सूर्यवंशी, प्रा.स्वप्नील धांडे, कार्यालयीन सहकारी प्रमोद पाटील,मंगेश नेवे,अजय काळे,सागर कोल्हे,युवराज पाटील,एकनाथ किरंगे,गोकुळ पाटील उपस्थित होते.

