अतिवृष्टीने प्रभावित शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी दिपक पाटील वाघोदे यांची मंगरूळ येथे बांधावर भेट
1 min read

अतिवृष्टीने प्रभावित शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी दिपक पाटील वाघोदे यांची मंगरूळ येथे बांधावर भेट

Loading

अतिवृष्टीने प्रभावित शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी दिपक पाटील वाघोदे यांची मंगरूळ येथे बांधावर भेट

अमळनेर प्रतिनिधी
मंगरूळ – मंगरूळ गटाचे जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील वाघोदे यांनी मंगरूळ परिसरातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या वेदना आणि अडचणी प्रत्यक्ष पाहिल्या. अतिवृष्टीमुळे कापूस व मका पिके नुकसानीस पाठवली असताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे हमीभाव न मिळाल्यामुळे मोठा त्रास होत आहे. या भेटीदरम्यान दिपक पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न ऐकले आणि परिस्थितीची गांभीर्य जाणून घेतली.
शेतकरी प्रवीण गोरख पाटील, राजेंद्र जगन्नाथ पाटील यांसह मार्गदर्शक बापूसाहेब जगन्नाथ राजमल पाटील वाघोदे उपस्थित होते. दिपक पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आणि सरकारकडे योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी त्यांनी नमूद केले की, “शेतकरी वर्ग हा देशाचा पोशिंदा आहे, त्यांची समस्या आणि वेदना समजून घेणे हे शासन व स्थानिक प्रतिनिधींचे कर्तव्य आहे. निसर्गाने साथ दिली नाही तरी स्थानिक भुमीपुत्रानेही साथ दिली पाहिजे.”
शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांसाठी केलेल्या कष्टांचे योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी दिपक पाटील पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या वेदना पाहून त्यांचे मन जणू खचले, आणि त्या परिस्थितीवर स्थानिक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *