जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्हे बु येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना* ….  *कुर्हे बु शाळेचे माजी विद्यार्थी शाळा विकासासाठी सरसावले….*
1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्हे बु येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना* …. *कुर्हे बु शाळेचे माजी विद्यार्थी शाळा विकासासाठी सरसावले….*

Loading

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्हे बु येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना* ….

*कुर्हे बु शाळेचे माजी विद्यार्थी शाळा विकासासाठी सरसावले….*

अमळनेर प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्हे बु ता.अमळनेर येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासननिर्णया नुसार दि.21/10/2025 रोजी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दिवाळी निमित्त गावात आलेले विविध क्षेत्रात कार्यरत सर्व माजी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.उपक्रमशील शिक्षक श्री अशोक पाटील यांनी शाळा भौतिक दृष्टीने समृद्ध करण्याच्या अनुषंगाने माजी विद्यार्थ्यांना शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करून शाळेला आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.आयटी इंजिनिअर संदेश संतोष पाटील यांनी दहा हजार रुपये रोख सह इतर माजी विद्यार्थ्यांनी 67400 रू.निधी शाळा विकासासाठी दिला तर मुंबई पोलीस प्रशांत आत्माराम पाटील यांनी शाळेस एक संगणक संच देण्याचे कबूल केले.
याप्रसंगी *माजी विद्यार्थी संघाची* स्थापना करून सर्वानुमते श्री.संदेश रविंद्र पाटील यांची अध्यक्षपदी,श्री.संदेश समाधान पाटील यांची उपाध्यक्षपदी,श्री.अभिषेक भोसले यांची कार्याध्यक्ष पदी तर श्री .मंगलेश समाधान पाटील यांची कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली..सर्व नव नियुक्त पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.रियाज शेख यांनी अभिनंदन करून आभार मानले. माजी विद्यार्थी मेळावा यशस्वितेसाठी गावातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी,मा.सरपंच,मा.उपसरपंच, सतिमाता ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सतिमाता युवा प्रतिष्ठानचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *