शिक्षक संघटनेचे निष्ठावान नेते दादासाहेब भिरूड यांचा गौरव — मराठी लाईव्ह न्यूजतर्फे शाल-बुके व सन्मानपत्र प्रदान
![]()
शिक्षक संघटनेचे निष्ठावान नेते दादासाहेब भिरूड यांचा गौरव — मराठी लाईव्ह न्यूजतर्फे शाल-बुके व सन्मानपत्र प्रदान
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष, शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते व सर्वांचे मार्गदर्शक दादासाहेब शालिग्राम भिरूड यांची तज्ञ संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, शिक्षक पत्रकार ईश्वर महाजन तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमात दादासाहेब भिरूड यांना सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
दादासाहेब भिरूड यांनी शिक्षक संघटनेत काम करतांना अनेक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावल्या, चळवळींमध्ये पुढाकार घेतला आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी सदैव खंबीरपणे उभे राहिले. जळगाव जिल्हा शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक व विश्वासार्ह ठेवला.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सभासद, मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांची पुन्हा तज्ञ संचालक पदी नियुक्ती केली.
मराठी लाईव्ह न्यूजचे संपादक ईश्वर महाजन यांनी सन्मानपत्र वाचून दादासाहेब यांचा सन्मान करताना सांगितले की, “भिरूड सरांसारखे प्रामाणिक, तळमळीचे व नेतृत्वगुण असलेले व्यक्तिमत्व शिक्षक समाजाचे खरे प्रेरणास्थान आहे.”
सन्मान स्विकारताना दादासाहेब भिरूड यांनी मराठी लाईव्ह न्यूजचे आभार मानले व आपल्या दीर्घ कार्यकाळातील अनुभव गप्पांमधून शेअर केले.
कार्यक्रम वातावरणात आनंद, आत्मीयता आणि शिक्षक बांधिलकीची झलक दिसून आली.


