पिंपळे येथे कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयाच्या 2007-08 च्या बॅचचा भाऊबीज निमित्त स्नेहमेळावा संपन्न
1 min read

पिंपळे येथे कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयाच्या 2007-08 च्या बॅचचा भाऊबीज निमित्त स्नेहमेळावा संपन्न

Loading

पिंपळे येथे कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयाच्या 2007-08 च्या बॅचचा भाऊबीज निमित्त स्नेहमेळावा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(जगदीश पाटील)
पिंपळे (ता. अमळनेर) येथे कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इ. 10वी (2007-2008) च्या विद्यार्थ्यांनी 17 वर्षांनंतर भाऊबीजच्या शुभ मुहूर्तावर एकत्र येत संस्मरणीय स्नेहमेळावा आयोजित केला. या स्नेहमेळाव्यात 17 विद्यार्थिनी व 20 विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक नानासो जगदीश पाटील सर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दादासो एस. एच. पाटील सर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रसंगी समाधान पाटील, प्रगती पाटील, इंजि. राहुल पाटील, डॉ. भगतसिंग पाटील, अजित पाटील, राहुल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले.
कार्यक्रमात भारती पाटील, वर्षा पाटील, अनिता पाटील, समाधान पाटील (फौजी), सागर पाटील, रूपाली पाटील, रूपाली मिस्त्री, गजानन पाटील, भरत शिंग यांसह सर्व विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गमतीदार, आठवणीत राहणाऱ्या क्षणांचे अनुभव सांगून वातावरण भावुक केले.
स्नेहमेळाव्यानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगला आणि सर्वांनी एकमेकांना भाऊबीजच्या शुभेच्छा देत आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली.
या स्नेहमेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी चंद्रशेखर पाटील, ज्योती पाटील, साधना पाटील, रोहिदास पाटील तसेच पिंपळे बु., पिंपळे खु., अनोरे, आटाळे, वाघोद येथील सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

संपूर्ण कार्यक्रम उत्साह, आठवणी आणि भावनांनी ओथंबलेला ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *