कळमसरे गावावर शोककळा — तुळसाबाई पुंडलिक महाजन यांचे निधन , त्यांचा अंत्यविधी उदया शुक्रवार, दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता कळमसरे येथे राहत्या घरापासून निघणार
![]()
कळमसरे गावावर शोककळा — तुळसाबाई पुंडलिक महाजन यांचे निधन
त्यांचा अंत्यविधी उदया शुक्रवार, दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता कळमसरे येथे राहत्या घरापासून निघणार
अमळनेर प्रतिनिधी :
कळमसरे गावातून अत्यंत दुःखद बातमी प्राप्त झाली आहे की, गं.भा. तुळसाबाई पुंडलिक महाजन यांचे आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025, गुरुवार रोजी रात्री 8:00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्वभावाने मितभाषी, प्रेमळ, आणि कर्तव्यनिष्ठ असलेल्या तुळसाबाई यांनी आयुष्यभर कुटुंब व समाजातील प्रत्येकाशी आपुलकीचे नाते जपले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंत्यविधी शुक्रवार, दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता कळमसरे येथे राहत्या घरापासून निघणार आहे.
त्या श्री. कौतिक पुंडलिक महाजन यांच्या मातोश्री, तसेच
श्री. रविंद्र कौतिक महाजन (माळी समाज पंच मंडळ उपाध्यक्ष, कळमसरे) आणि श्री. प्रशांत कौतिक महाजन यांच्या आजी होत.
🙏 शोकाकुल परिवार 🙏
श्री. कौतिक पुंडलिक महाजन (मुलगा)
श्री. रविंद्र कौतिक महाजन (नातू)
श्री. प्रशांत कौतिक महाजन (नातू)
समस्त नेरकर परिवार, कळमसरे
कळमसरे समाजबांधव,ग्रामस्थ मंडळ
यांनी शोक व्यक्त केला आहे.
💐💐💐💐

