निराधारांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – प्रा.बी.एन.चौधरी : ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडारतर्फ मिठाई-कपडे वाटप :
![]()
निराधारांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – प्रा.बी.एन.चौधरी :
ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडारतर्फ मिठाई-कपडे वाटप :
धरणगाव प्रतिनिधी :
निराधारांना आधार देत गरजवंताला निस्वार्थ भावाने केलेली मदत हीच खरी परमेश्वराची सेवा आहे असे प्रतिपादन जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी व्यक्त केले. ते मुन्नादेवी – मंगलादेवी फाऊंडेशनच्या ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योगपती जिवनसिंग बयस होते.
फाऊंडेशनतर्फे वर्षभर ५० निराधार व्यक्तिंना भोजन डबे दिले जातात. दिवाळी निमित्त त्यांना मिठाई-कपडे वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फाऊंडेशनचे कार्य हे जनसेवेचे उदात्त उदाहरण असून गोरगरीब, निराधारांचे दुःख जाणून त्यांना वर्षभर मोफत अन्नदान करणे, दिवाळीला मिठाई कपडे देणे हे सर्वश्रेष्ठ दान असून जिवनसिंग बयस यांनी सुरु केलेला उपक्रम सर्वांना प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन डॉ. मिलिंद डहाळे यांनी केले. या निमित्ताने कडू महाजन, मुकेश तिवारी यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष जिवनबयस यांनी राजकारणापेक्षा समाजसेवेत आपल्याला आनंद मिळतो आणि आपण हे कार्य आयुष्यभर करत राहू असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी हेरिटेज गृप आणि जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य वा. डी. महाजन, राहूल जैन, विनोद रोकडे, एस. पी. पाटील, सखाराम माळी उपस्थित होते. कार्यक्रमात घरपोच डबे पोहचविणारे नामदेव मराठे आणि आचारी दुर्गेश बायस, मैनेजर किरण बायस, रवि बायस
मदतनिश रेखाबाई, अलकाबाई, सुमनबाई, पंचशीलाबाई यांचा समयोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुकेश बयस यांनी केले. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन निलेश बयस तर आभार प्रदर्शन प्रितम बयस यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रेय चौधरी, निखिल बायस, हर्षल बायस, विक्की बायस, कपिल चव्हाण, गौरव चव्हाण, गोरख देखमुख, याकूब पठान, पंकज बायस यांनी परिश्रम घेतले.

