अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकरी… आणि त्यांचा आधार ठरले माजी आमदार शिरीषदादा चौधरी — अमळनेरच्या न्यायासाठी थेट पालकमंत्र्यांकडे धाव!”
1 min read

अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकरी… आणि त्यांचा आधार ठरले माजी आमदार शिरीषदादा चौधरी — अमळनेरच्या न्यायासाठी थेट पालकमंत्र्यांकडे धाव!”

Loading

अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकरी… आणि त्यांचा आधार ठरले माजी आमदार शिरीषदादा चौधरी — अमळनेरच्या न्यायासाठी थेट पालकमंत्र्यांकडे धाव!”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
अमळनेर तालुक्याचा अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या १८ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयामध्ये समावेश नसल्याचे समोर येताच, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील यांना पाळधी येथे भेटून मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी तातडीने निवेदन दिले.
या निवेदनात आमदार चौधरी यांनी स्पष्ट केले की, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांना शासन मदतीपासून वंचित ठेवणे अत्यंत अन्यायकारक ठरेल. त्यांनी पालकमंत्र्यांना विनंती केली की, तात्काळ सुधारित शासन निर्णय निर्गमित करून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
जळगाव जिल्ह्यातील ३,२५,३५९ शेतकऱ्यांना २,४७,२६२.०१ हेक्टर क्षेत्राकरिता रु. २९९९४.४७ लाख इतकी मदत जाहीर झाली असली तरी, अमळनेर तालुका यातून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या संदर्भात पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत — “अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल,” असे आश्वासन मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांना दिले.
या प्रसंगी अमळनेर तालुका प्रमुख सुरेश पाटील, किशोर पाटील, रोशन सोनवणे, नगरसेवक अनिल महाजन तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *