आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – डीवायएसपी वासुदेव देसले  अमळनेर येथे “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” सह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
1 min read

आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – डीवायएसपी वासुदेव देसले अमळनेर येथे “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” सह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Loading

आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – डीवायएसपी वासुदेव देसले

अमळनेर येथे “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” सह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अमळनेर प्रतिनिधी – आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी आहे. आईवडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. या उद्देशाने प्रत्येक मुलाने आपले नैतिक कर्तव्य पार पाळावे. श्रावण बाळ सेवा पुरस्कार दिल्याने कौटुंबिक संस्थेला बळकटी येईल असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले यांनी केले. येथील श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व डॉ.सौ. माधुरी मनोहर भांडारकर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रावण बाळ सेवा पुरस्कार तसेच दहावी बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई देसले, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, संचालक संजय शुक्ल, सौ भांडारकर बहुउद्देशीय संस्थेचे संचालक हेमंत भांडारकर, निवृत्त प्राध्यापक डॉ. पी जे जोशी, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री देसले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून आपले ध्येय निश्चित करा. मागे वळून न पाहता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर योग्य नियोजनाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण उच्च पदावर जाऊ शकतो असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. पोलीस निरीक्षक श्री निकम म्हणाले की, अनेक विद्यार्थी आपले ध्येय छोटे ठेवतात, त्यापेक्षा आपले ध्येय मोठे ठेवा व त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. यश आपोआप मिळते. यावेळी सुषमा देसले, उमेश काटे, अँड. शकील काझी, संजय पालकर, अतुल सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुमित कॉम्प्युटर्स तर्फे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले ‘एआय’ वर आधारित ॲप्स चे लोकार्पण करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सन्मान!

अमळनेर तालुक्यासह पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री, बहादरपूर, रत्नापिंप्री, राजवड या गावातील दहावी व बारावी मधील ८५% वरील गुण मिळवलेले सुमारे साडेतीनशे गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातून शासकीय सेवेत निवड झालेले युवा अधिकारी शुभम पाटील, धीरज पाटील, निलेश पाटील, प्रशांत पाटील, मोहम्मद उसेद शकील काझी, उदय सोनार, कविता बिऱ्हाडे, गौरव भोईटे यांचा ही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वासुदेव देसले (दहिवद) व रमेश चौधरी (कळमसरे) यांच्या दातृत्वातून सर्व विद्यार्थ्यांना फाइल्स वाटप करण्यात आले. यावेळी शांतीलाल रायसोनी, रामराव पवार, राजेंद्र देसले, भावेश चौधरी, सुशील भोईटे, अशोक कोष्टी, आकाश चौधरी आदींसह राजू फाफोरेकर, जितेंद्र पाटील, भिकनराव पाटील, अनिल काटे, रणजीत शिंदे, रत्नाकर पाटील आदी उपस्थित होते. सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले. साने गुरुजी वाचनालयाचे माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

हे आहेत सन्मानित पुरस्कार्थी!

सुसंस्कृत कुटुंब पद्धतीला चालना देण्यासाठी संस्थानतर्फे गेल्या पाच वर्षापासून जी व्यक्ती वृद्ध आई-वडिलांची सेवा करतात त्यांना “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” दिले जातात. यावर्षी या पुरस्कारार्थी मध्ये जयेशकुमार काटे व उमेश काटे या पत्रकार बंधूसह रमेश बुधा शिरसाट, रहेमतुल्ला बैतुल्ला पिंजारी, शशिकांत दत्तात्रेय चौधरी, चेतन महाजन, प्रशांत मनोहर वाणी, भरतसिंग परदेशी, रमेश चिंधा चौधरी,गणेश चिंधा चौधरी,
ॲड.तिलोत्तमा पाटील, रवींद्र सोमा महाजन अशा व्यक्तींना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *