“अमळनेर प्रभाग 16 (ब) मध्ये विकासाचा नवा प्रवास – सौ. विद्या भदाणे उमेदवार!”
![]()
अमळनेर प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व सन्माननीय नागरिक, हितचिंतक आणि महिला भगिनींना
दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी, भूषण संजय भदाणे
(जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जळगाव), आपला सेवक, हे आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांसमोर आदरपूर्वक सादर करतो.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात कार्य करताना, मी नेहमीच जनतेच्या विकास, सुख-समृद्धी आणि कल्याण या ध्येयाला प्राधान्य दिले आहे. यापुढे माझा प्रभाग क्रमांक 16 (ब) मधील विकासाचा ध्यास आहे. त्या अनुषंगाने माझी मातोश्री, सौ. विद्या संजय भदाणे, प्रभाग क्रमांक 16 (ब) मधील सर्वसाधारण महिला मतदार संघात उमेदवारी अर्ज करीत आहेत.
आपणास हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो की, माझा संपूर्ण परिवार नेहमीच प्रभागवासीयांच्या सुख-दुःखात सहभागी राहिला आहे. जनहिताचे कार्य करणे, समाजासाठी पुढाकार घेणे हे आमच्या सर्वांचेच ध्येय आहे.
आतापर्यंत आपल्या प्रभागात विकासाचे कार्य सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. आपल्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली, माजी मंत्रीमहोदय व आमदार आदरणीय श्री अनिलदादा पाटील आणि माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई अनिल पाटील यांच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवले आहेत.
यापुढेही, जनतेचा आशीर्वाद लाभल्यास आम्ही निश्चितच प्रभावी व दूरगामी विकासकार्य करणार आहोत. त्यासाठी, आपल्या विश्वासाचे व आशीर्वादाचे महत्व आमच्यासाठी अनमोल आहे. 🙏
आपल्या सर्वांचा सतत आशीर्वाद मिळावा, हीच मनःपूर्वक नम्र विनंती.
भूषण संजय भदाणे
जिल्हाध्यक्ष –राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जळगाव
सौ. विद्या संजय भदाणे
प्रभाग क्रमांक 16 (ब)
सर्वसाधारण महिला मतदार संघ

