कळमसरे-प्र.डांगरी जि. प.गटासाठी तरुणाईची गौतम भाऊंना साद* आता लक्ष माननीय आमदार *अनिल दादांच्या निर्णयाकडे*
![]()
*कळमसरे-प्र.डांगरी जि. प.गटासाठी तरुणाईची गौतम भाऊंना साद*
आता लक्ष माननीय आमदार *अनिल दादांच्या निर्णयाकडे*👆👆👆
अमळनेर तालुक्यात माननीय आमदार अनिलदादा पाटील व माजी जि.प.सदस्या सौ जयश्रीताई पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कळमसरे-प्र.डांगरी जिल्हा परिषद गट *खुला* झाल्याने खुल्या गटातील अनेक नवतरुणांना राजकीय वर्तुळातील प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.
मग अश्या स्थितीत या गटातील तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात आग्रह होत आहे तो माननीय आमदार अनिलदादा यांचे सुपुत्र गौतम भाऊ यांच्या नावाचा.गौतम भाऊ स्वतः सिव्हिल इंजिनिअर असून अमेरिकेतून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मायदेशी परतून सद्यस्थितीत आपल्या परिवाराचा कन्स्ट्रक्शनचा बिझिनेस अतिशय उत्तमरित्या सांभाळत आहेत.अतिशय गुणी,हुशार,सुस्वभावी,सामाजिक विचारसरणी,काहीतरी नवीन घडविण्याची उमेद असे अनेक गुण गौतम भाऊच्या अंगी असल्याने या तरुण व्यक्तीमत्वाने कळमसरे जि.प.गटातून राजकीय श्रीगणेशा करावा असा प्रचंड आग्रह गावागावातील तरुणाईकडून होऊ लागला आहे.तरुणाई आग्रही असली तरी खरेतर माननीय आमदार अनिलंदादा काय निर्णय घेतात,*दिवाळीत आपल्या सुपुत्राचे फटाके ते वाजवितात का?* याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
प्रतिक्रिया
युवकांचे प्रतिनिधित्व हवे ..!
आजपर्यंत आमच्या कळमसरे प्र. डांगरी गटाला युवकांचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व लाभलेले नाही…म्हणूनच यावेळी आमची मागणी आमचे लोकप्रिय नेते माजी मंत्री तथा आमदार अनिल दादा यांच्या कडे असेल की, या वेळी युवकांचा एक सक्षम प्रतिनिधी म्हणून 🎓 उच्चशिक्षित, 🤝 सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले, 🏠 घरातच समाजकारण व राजकारणाचे बाळकडू मिळालेले
गौतम भाऊंना संधी दिल्यास निश्चितच या गटाचा सर्वांगीण विकास होईल, युवकांना नवी दिशा मिळेल, आणि सर्व समाजघटकांच्या मनातील अपेक्षा पूर्ण होतील, अशी आम्हाला ठाम खात्री आहे!
निनाद सुनील शिसोदे
जिल्हा उपाध्यक्ष- रा. यु.काँग्रेस जळगाव
रा- प्र.डांगरी ता.अमळनेर जिल्हा जळगाव.


