“मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ – सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वरीष्ठ प्रबंधक मयुरजी पाटील यांची निवड”
![]()
“मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ – सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वरीष्ठ प्रबंधक मयुरजी पाटील यांची निवड”
अमळनेर प्रतिनिधी – मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री मयुर चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
मयुरजी पाटील हे मु. पो. जवखेडे, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते असून बीएससी कृषी आणि एमबीए ऍग्री फायनान्स (मुंबई युनिव्हर्सिटी) पदवीधर आहेत. वडील शेतकरी असताना राष्ट्रीयकृत बँकेत कृषी अधिकारी म्हणून निवड होणे हा त्यांच्या जीवनातील अत्यंत प्रेरणादायी क्षण ठरला.
त्यांच्या सामाजिक कार्यात विशेष ठळक योगदान खालीलप्रमाणे आहे:
रक्तदान आणि आरोग्य शिबिरे: 2005 पासून जवखेडे येथे नियमित रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
स्त्री भ्रूणहत्या विरोधी जनजागृती: 2006 मध्ये स्त्री भ्रूणहत्या विरोधी परिषद आयोजित करून पथनाट्य, व्याख्यान व चर्चेद्वारे गावातील महिलांमध्ये जनजागृती केली. या परिषदेत 200 हून अधिक महिलांचा सहभाग नोंदवला गेला.
जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन: वॉटर कप मोहिमेद्वारे लोकसहभागातून शोष खड्डे भरून गाव गटारमुक्त केले, नाला खोलीकरण केले, शेततळे तयार केले व गावातील 110 हेक्टर क्षेत्र ओलित केले.
शैक्षणिक विकास: गावातील शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी लोकवर्गणीतून शाळा डिजिटल व बोलकी करण्यासाठी पुढाकार घेतला. 2015 पासून ज्ञानवर्धिनी अभ्यासिका सुरू करून तरुणांना पुस्तके, ग्राउंडसाठी बूट व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.
मयुरजींच्या या सामाजिक कार्यामुळे गावातील २५ हून अधिक गरीब तरुणांना नोकरी मिळाली, गावातील १००% लोकांचा विमा रक्कम रु. २ लाखांपर्यंत काढला गेला, तसेच गावातील विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली.
मयुरजी पाटील यांचे अनुभव:
“समाजासाठी काम करताना लोकांचा मिळालेला प्रतिसाद हा सर्वात मोठी प्रेरणा असतो. गावातील काम करताना अनेक अफवांना तोंड द्यावे लागले, पण त्याकडे दुर्लक्ष करून काम करत राहिलो. मराठी लाईव्ह न्युजच्या या सत्कारामुळे काम करण्याचा उत्साह द्विगुणित झाला आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव वाढली,” असे मयुरजी यांनी सांगितले.
त्यांच्या भविष्यकालीन योजना देखील समाजोपयोगी आहेत. यामध्ये शाळा बळकटीकरण, अभ्यासिकेत अधिक सुविधा उपलब्ध करून शिक्षणाचा दर्जा उंचावणे, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी जनजागृती करणे आणि जलसंधारणासाठी नालाखोलीकरण करणे यांचा समावेश आहे.
सत्काराची महत्त्वाची भावना:
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मयुरजी पाटील यांचा सत्कार हे ग्रामीण समाजातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. वॉटर कप स्पर्धेदरम्यान संपूर्ण गाव श्रमदानासाठी एकत्र आलेला क्षण आणि अभ्यासिकेद्वारे गरिब परिवारातील तरुणाचा नोकरीत यशस्वी होणे यासारखे क्षण हे त्यांचे सर्वात गौरवाचे क्षण मानले जातात.


