मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रमात आदर्श माता-पिता पुरस्काराने दशरथ नाना लांडगे व वसुंधराताई लांडगे यांचा होणार गौरव
![]()
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रमात आदर्श माता-पिता पुरस्काराने दशरथ नाना लांडगे व वसुंधराताई लांडगे यांचा होणार गौरव
अमळनेर प्रतिनिधी
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तुत्वाचा 2025 – प्रेरणा पर्व” या भव्य कार्यक्रमात अमळनेरच्या नामांकित दाम्पत्याचा — दशरथ सोमा लांडगे व सौ. वसुंधरा दशरथ लांडगे — यांचा “आदर्श माता-पिता पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
सौ. वसुंधरा दशरथ लांडगे या सेवानिवृत्त शिक्षिका असून सध्या अर्बन बँक अमळनेर संचालिका, विश्वस्त खा.शी मंडळ अमळनेर तसेच संचालिका मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. संगीत विशारद असलेल्या वसुंधरताई यांना सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सोबत गायन व सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती — त्या क्षणाला त्या त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी क्षण म्हणतात.
त्या सांगतात —
> “माझ्या पती दशरथ नाना लांडगे यांनी मला घराबाहेर पडून काम करण्याची प्रेरणा दिली. माझ्या प्रत्येक कार्यात त्यांनी मनापासून साथ दिली. आज मी जे काही आहे, त्यामागे त्यांचे मोलाचे योगदान आहे.”
वसुंधरताई समाजसेवेबद्दल म्हणतात —
> “मी लोकांसाठी जे काही करते, त्याचा मोबदला कधीच घेतला नाही. समाजसेवा करतांना अनेक आव्हाने आली, पण माझ्या पतीच्या साथीने मी त्या सर्वांवर मात केली. महिलांसाठी काहीतरी उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला माझ्या पतीकडून आणि मुलीकडून सतत प्रेरणा मिळते.”
त्यांच्या मते, “युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, निस्वार्थपणे काम करत राहावे. आपल्या कार्याची दखल कुणीतरी घेतो, हीच खरी प्रेरणा आहे. मराठी लाईव्ह न्युजने आमच्या कार्याची दखल घेतली, याचा मनापासून आनंद झाला.”
दशरथ सोमा लांडगे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्या प्रसारक मंडळ जळगाव चे संचालक तसेच चेअरमन – साने गुरुजी पिक संरक्षक सोसायटी, अमळनेर आहेत. ते सामाजिक कार्यकर्ते असून गरीब व गरजूंना मदत करणे, समाजात सकारात्मक बदल घडविणे हे त्यांचे जीवनधर्म आहे.
त्यांचा स्वभाव अतिशय साधा, कुटुंबवत्सल आणि प्रामाणिक आहे. वसुंधराताईंच्या यशामागे दशरथ नाना लांडगे यांचा सिंहाचा वाटा आहे. अडचणींवर मात करून कार्य तडीस नेण्यात ते पारंगत आहेत. त्यांचे मित्रपरिवार विस्तृत असून समाजातील प्रत्येक घटकाविषयी त्यांना आत्मीयता आहे.
“साधी राहणी, पण विचार मात्र उच्च” — हेच या दाम्पत्याचे खरे वैशिष्ट्य आहे.
मराठी लाईव्ह न्युजच्या या सन्मानाबद्दल लांडगे दाम्पत्याने कृतज्ञता व्यक्त करत म्हटले —
“अकरा दिग्गज मान्यवरांमध्ये आम्हाला आदर्श माता-पिता पुरस्कारासाठी निवडले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मराठी लाईव्ह न्युजचे मनःपूर्वक आभार.”


