दिवाळी पुर्वी अनुदान नाही* *▪️एक वर्ष झाले कर्जमुक्ती नाही* *▪️जाहीर करुन फसवलं* *▪️आज धरणगावात शेतकऱ्यांचा हंबरडा…!*
![]()
*▪️दिवाळी पुर्वी अनुदान नाही*
*▪️एक वर्ष झाले कर्जमुक्ती नाही*
*▪️जाहीर करुन फसवलं*
*▪️आज धरणगावात शेतकऱ्यांचा हंबरडा…!*
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव — तालुक्यातील महाविकास आघाडीचा वतीने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी थेट खात्यात लाभ मिळावा, कर्जमुक्ती करण्यात यावी यासंदर्भात निघालेल्या हंबरडा मोर्चात जोरदार घोषणाबाजी, बैलगाडी, उड्डाणपुलावर रास्ता रोको करूत तहसिलदार व कृषी अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत प्राप्त झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी अनुदान मिळाले पाहिजे यासाठी छत्रपती शिवरायांना माल्यार्पण करून उड्डाणपुलावर रास्ता रोको, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, गुणा गुलाब न्हाळदे यांचे बैलगाडे यांसह शेतकरी हंबरडा मोर्चा काढण्यात आला. जळगाव येथील सागर पार्कवर विधानसभेला मतदान मागण्यासाठी आले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सरसकट ७/१२ कोरा करुन कर्जमुक्ती केली पाहिजे, रब्बी हंगामासाठी जाहीर केल्याप्रमाणे १०,००० अनुदान दिले पाहिजे, अतिपावसामुळे वाहून गेलेले घरे, गुरे, ढोरे, पशु – पक्षी प्रत्येकी अनुदान, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५०,०००/ हजार सानुग्रह अनुदान, पिक विमा मागील निकषाप्रमाणे मिळाला पाहिजे, शेतमालाची हमीभावाने खरेदी करावी, उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या ज्वारीची तात्काळ खरेदी करण्यात यावी, खतांच्या किमती कमी करून त्यावरील जीएसटी रद्द करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जयदीप पाटील, संजय पाटील, महेश (बंटी) पवार आणि गुलाबराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यात. शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी महाविकास आघाडी व शेतकऱ्यांच्या वतीने हंबरडा आंदोलन करण्यात आले.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुलाबराव वाघ, जयदीप पाटील, निलेश चौधरी,भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, लीलाधर पाटील, परमेश्वर महाजन, विजय पाटील, संतोष सोनवणे, कृपाराम महाजन, राहुल रोकडे, शुभम महाजन, गजानन महाजन, विनोद रोकडे, रमेश पारधी, वसंत पारधी, सुनिल चव्हाण, भाऊसाहेब किरण मराठे, जितेंद्र धनगर, रणजित सिकरवार, सतिष बोरसे, कैलास चौधरी, भीमराव धनगर, गोपाल चौधरी, गजानन महाजन, प्रेमराज चौधरी, गोपाल महाजन, वसीम खान, मनोज पटूणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय पाटील, बाळासाहेब पाटील, गोविंद कंखरे, भरत मराठे, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, कल्पिता पाटील, एकनाथ पाटील, भगवान शिंदे, आबा पाटील, परेश गुजर, मोहीत पवार, दिनकर पाटील, लक्ष्मणराव पाटील, खलील (बंटी) खान, गोपाल माळी, सुभाष पाटील, अमित शिंदे, नारायण चौधरी, रामकृष्ण पवार, प्रमोद पाटील, राहुल पाटील, साजिद कुरेशी, प्रफुल पवार, जुनेद बागवान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सम्राट परीहार, रामचंद्र माळी, महेश (बंटी) पवार, नंदलाल महाजन, सुनिल बडगुजर, योगेश येवले या तिन्ही पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

