न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपोत्सवाचा जल्लोष — अयोध्येच्या आगमनाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
1 min read

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपोत्सवाचा जल्लोष — अयोध्येच्या आगमनाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Loading

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपोत्सवाचा जल्लोष — अयोध्येच्या आगमनाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळीच्या स्वागताचा दीपोत्सव उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात लखलखणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी आनंदमयी वातावरण अनुभवले.
कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी राम-सीता-लक्ष्मण आणि हनुमान यांच्या अयोध्यागमनाचा देखावा सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. शबरीचे ‘राम आयेंगे तो अंगणा सजाऊंगी’ हे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. त्यानंतर लहान विद्यार्थिनींनी ‘दीपावली मनाये सुहानी’ या गीतावर सादर केलेले नृत्य प्रेक्षकांची मनं जिंकून गेले.
कार्यक्रमात साईबाबांचे प्रतिरूप, सुंदर आकाशकंदिल, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि झगमगणारे दिवे यामुळे संपूर्ण शाळा प्रकाशमय झाली होती.
या प्रसंगी प्राचार्या सौ. सुमित्रा झाँजोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, तो अंधारावरच्या प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. सर्वांनी सुरक्षित आणि सद्भावनेने हा सण साजरा करावा.”
उपप्राचार्या सौ. दीपाली राजपूत यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प दिला. शाळा प्रशासन समितीच्या वतीने सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मिष्ठान्न बॅग्स भेटस्वरूपाने वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सुमधुर संगीताच्या तालावर मनसोक्त नृत्य करत दिवाळीच्या आनंदात भर टाकली. परिसरात कोठ्या, फुलझड्या आणि फटाक्यांच्या रोषणाईने जल्लोषाचे वातावरण पसरले.
शेवटी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थितांनी एकमेकांना “शुभ दीपावली”च्या शुभेच्छा देत आनंदाने कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *