शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम — मोफत कायदेशीर मार्गदर्शनाची सुविधा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीचे अनमोल भेट:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे.
1 min read

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम — मोफत कायदेशीर मार्गदर्शनाची सुविधा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीचे अनमोल भेट:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे.

Loading

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम — मोफत कायदेशीर मार्गदर्शनाची सुविधा
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीचे अनमोल भेट:- समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे.
जळगाव (प्रतिनिधी) : सध्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अध्यापन कार्यासोबतच विविध शैक्षणिक आणि अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे मानसिक तणावाखाली काम करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक अडचणी, प्रश्‍न व कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी ना वेळ मिळतो ना योग्य मार्गदर्शन. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत शिक्षक व कर्मचाऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन मोफत दिले जाणार आहे. यासाठी शिक्षणक्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक, शिक्षक नेते तसेच शिक्षण हक्क सेवा हमी कायद्यातील जाणकार श्री. प्र. ह. दलाल सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. गरजू शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कन्हैयालाल प्लॉट, जामनेर रोड, भुसावळ येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 9 ते 12 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत भेट द्यावी. त्यांचा संपर्क क्रमांक आहे – 7620132175.

“शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन समितीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, कार्याध्यक्ष पी ए पाटील व तुळशीराम सोनवणे, जिल्हा समन्वयक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव यांनी केले आहे.
याप्रसंगी समन्वय समितीचे मार्गदर्शक पी एस सोनवणे, डॉ मिलिंद बागुल, सिद्धोधन सोनवणे, डॉ संजू भटकर, सुरेश अहिरे,सुनील वानखेडे महिला प्रतिनिधी सुनीता खडके सुनीता पाटील, अश्विनी पाटील, उपाध्यक्ष गोविंदा पाटील, देवेंद्र तायडे, पी.बी नरवाडे प्रसिद्धी प्रमुख दिनेश पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *