अल्पशा आजाराने सुरेंद्र बोरसे सर यांचे दुःखद निधन — समाजकार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण   त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर येथील राहत्या घरून (दौलतराव पार्क, अनुसया पेट्रोल पंप मागे, धुळे रोड, अमळनेर) निघणार
1 min read

अल्पशा आजाराने सुरेंद्र बोरसे सर यांचे दुःखद निधन — समाजकार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर येथील राहत्या घरून (दौलतराव पार्क, अनुसया पेट्रोल पंप मागे, धुळे रोड, अमळनेर) निघणार

Loading

अल्पशा आजाराने सुरेंद्र बोरसे सर यांचे दुःखद निधन — समाजकार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण

त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर येथील राहत्या घरून (दौलतराव पार्क, अनुसया पेट्रोल पंप मागे, धुळे रोड, अमळनेर) निघणार

अमळनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद शाळा लाडगाव (ता. अमळनेर) येथील उपशिक्षक श्री. सुरेंद्र बोरसे सर (पती — श्रीमती दर्शना चौधरी मॅडम, उपशिक्षिका जि.प. शाळा खडके) यांचे आज सकाळी १०.२५ वाजता नाशिक येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर येथील राहत्या घरून (दौलतराव पार्क, अनुसया पेट्रोल पंप मागे, धुळे रोड, अमळनेर) निघणार आहे. ते लोकमतचे रवींद्र बोरसे यांचे भाऊ होते.
सुरेंद्र बोरसे हे अखिल भारतीय माळी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी विविध सामाजिक संघटनांमध्ये जबाबदारीची पदे भूषविली असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी समाजातील एकोपा, शिक्षण आणि सामाजिक भान वाढविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले.
यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील,
मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष तथा व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय सचिव डॉ दिगंबर महाले,
महात्मा फुले हायस्कूल देवगाव देवळीचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक वृंद, अमळनेर फुल माळी समाजाचे पदाधिकारी, शिक्षक मित्र,पत्रकार बांधव, विविध समाज बांधव व मित्रपरिवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *