वाचनातून व्यक्तिमत्व घडवा” — महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
![]()
“वाचनातून व्यक्तिमत्व घडवा” — महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी — महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक वसंतराव पाटील यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेचे शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील आणि संभाजी पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व सांगणारे विचार मांडत “वाचा आणि घडवा” हा संदेश दिला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग खुला करण्याचा उद्देश साधण्यात आला.


