शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयात ठाणे झोन अंतर्गत महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयात ठाणे झोन अंतर्गत महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)शेठ हिराचंद मुथा शैक्षणिक ट्रस्ट संचालित शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात दिनांक 13 सप्टेंबर 2025 व 14 सप्टेंबर 2025 या दोन दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या,या स्पर्धेचे उद्घाटन शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे झोन सेक्रेटरी श्री. राहुल अकुल,बी.के बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.यज्ञेश्वर बागराव, मुंबई विद्यापीठ सदस्य श्री.गणेश मोरे, श्री.सतीश राजगुरू, श्री. मिलिंद ठाकूर, ट्रस्टी अन्वेषा मुथा,प्राचार्या सौ. अनुजा ब्रह्म,आय क्यू ए सी. समन्वयक डॉ.अजय पिल्ले यांची रामुख उपस्थिती होती.या स्पर्धेमध्ये ठाणे झोन अंतर्गत पुरुष गटातील 36 संघाने तर महिला गटातील 17 संघांनी सहभाग घेतला.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये महिला गटातील आर के टी कॉलेज उल्हासनगर हा संघ प्रथम पारितोषिक विजेता ठरला. तर एस आय इ एस महाविद्यालय नेरूळ हा संघ द्वितीय पारितोषिक विजेता ठरला. साधू बेला कॉलेज उल्हासनगर या संघाने तृतीय पारितोषिक मिळविले. तसेच पुरुष गट संघातील एस आय इ एस जी एसटी या संघाने प्रथम पारितोषिक मिळवले तर एस आय इ एस नेरूळ संघाने द्वितीय पारितोषिक मिळविले, तसेच बी के बिर्ला कॉलेज कल्याण या संघाने तृतीय पारितोषिक मिळवले.
यावेळी ट्रस्टी अन्वेषा मुथा,प्राचार्या सौ. अनुजा ब्रह्म,आय क्यू ए सी. समन्वयक डॉ.अजय पिल्ले , सीबीएससी स्कूल प्रिन्सिपल सौ. सपना गादिया, सीबीएससी जुनियर कॉलेज प्रिन्सिपल सौ.दिपाली कांबळे, ठाणे झोन सेक्रेटरी श्री. राहुल अकुल,बी.के बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.यज्ञेश्वर बागराव, मुंबई विद्यापीठ सदस्य श्री.गणेश मोरे, श्री.सतीश राजगुरू, श्री. मिलिंद ठाकूर तसेच सुबुलक्ष्मी तेवर मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील सूर्यराव यांनी केले तसेच मुथा महाविद्यालयाचे स्पोर्ट्स इन्चार्ज प्रा.दिनेश थळे, स्पोर्ट्स कमिटी सदस्य प्रा.जगन मिरकुटे सौ.दीपिका प्रसाद, निवेदिता शेवाळे,अवंतिका अडसुळे, उषा रेवाडे, ईशा मुलानी,अचल सूर्यभाम, इत्यादी प्राध्यापक व क्रीडा संचालक आणि खेळाडू उपस्थित होते.

