प्रभाग १४ मधून ॲड. सुरेश सोनवणे यांचा लोकसेवेचा निर्धार — जनतेच्या मनातील प्रामाणिक उमेदवार!
1 min read

प्रभाग १४ मधून ॲड. सुरेश सोनवणे यांचा लोकसेवेचा निर्धार — जनतेच्या मनातील प्रामाणिक उमेदवार!

Loading

 

प्रभाग १४ मधून ॲड. सुरेश सोनवणे यांचा लोकसेवेचा निर्धार — जनतेच्या मनातील प्रामाणिक उमेदवार!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच प्रभाग क्रमांक १४ मधून ॲड. सुरेश सोनवणे यांचे नाव जोरात चर्चेत आले आहे. आपल्या प्रामाणिक, मितभाषी आणि अभ्यासू स्वभावामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे.
सामाजिक आणि लोकाभिमुख कार्याची भक्कम पार्श्वभूमी :
ॲड. सोनवणे हे माजी नगरसेवक तसेच माजी उपाध्यक्ष – अमळनेर वकील संघ राहिले असून त्यांनी फुल माळी समाज अमळनेरचे अध्यक्ष आणि संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. वकीली व्यवसायासोबतच समाजकार्यातील बांधिलकी जपत ते नेहमीच लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात.

प्रभागातील विकासकामांचा ठसा :
त्यांच्या कार्यकाळात आणि पत्नी नगरसेविका असताना प्रभागातील साईबाबा मंदिराजवळ बोअरवेल बसवून २४ तास पाणीपुरवठा सुरू ठेवला, असे उल्लेखनीय काम त्यांनी केले. याशिवाय रस्ते, पथदिवे आणि स्वच्छता यावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. आजही नागरिक त्यांच्या कार्याची आठवण प्रेमाने काढतात.

महिलांच्या कल्याणासाठी कार्य :
श्रावणबाळ योजना अंतर्गत अनेक महिलांना मदतीचा हात देऊन त्यांनी प्रभागातील महिलांचा विश्वास संपादन केला आहे. सामाजिक उपक्रमांत त्यांचा सदैव सहभाग राहिला असून विविध समाजघटकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

माळी समाजातील नेतृत्व आणि संघटनशक्ती :
ॲड. सोनवणे यांनी माळी समाजात जिल्हास्तरावर अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालण्याची त्यांची हातोटी प्रसिद्ध आहे.

जनतेचा विश्वास – योग्य उमेदवार म्हणून चर्चा :
प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे की, “ॲड. सुरेश सोनवणे यांच्यासारखा लोकाभिमुख, अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्ती आपल्या प्रभागाचा नगरसेवक व्हावा.” त्यांच्या शांत, तळमळीच्या आणि संपर्कक्षम वृत्तीमुळे ते नागरिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.

थोडक्यात – जनतेच्या मनातील उमेदवार :
नगरपरिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकसेवेची संधी मिळावी, या निर्धाराने ॲड. सुरेश सोनवणे प्रभाग १४ मधून उमेदवारी सादर करणार असून, “योग्य नेतृत्व, प्रामाणिक काम आणि लोकसंपर्क यांचा संगम म्हणजे ॲड. सुरेश सोनवणे” असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *