प्रताप महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा*:
1 min read

प्रताप महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा*:

Loading

*प्रताप महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा*:
———————————————–
अमळनेर प्रतिनिधी- येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताचे ११ वे राष्ट्रपती शास्त्रज्ञ,भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.प्रियंका पाटील,डॉ.हेमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर डॉ.विजय तुंटे यांनी प्रकाश टाकले.ते म्हणाले की, गेली चार दशके वैज्ञानिक क्षेत्रात मूलभूत योगदान देणारे डॉ.कलाम हे अतुलनीय व्यक्तीमत्व होते,ज्ञानार्जनासाठी वाचन महत्वाचे असून वाचनाने मनुष्य श्रीमंत होतो.युवकांनी आपला वेळ व्यक्तिमत्त्व व राष्ट्र घडविण्यासाठी खर्च करावे आणि जिज्ञासू वृत्तीने प्रश्नांचे चिंतन करावे,अशा स्वरूपाचे मागर्दशन केले.
याप्रसंगी ग्रंथपाल दिपक पाटील यांनी ग्रंथालय व वाचन कक्ष आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे,याबाबतची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ.जाधव एच डी, डॉ.शशिकांत सोनवणे,डॉ.धिरज वैष्णव,डॉ.सुनील राजपूत,प्रा.दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर,दिलीप शिरसाठ,पराग रविंद्र पाटील,विशाल अहिरे आदींनी सहकार्य केले.यावेळी असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनीना विविध पुस्तकांचा परिचय करून देण्यात आले,प्रस्तुत कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती ही लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *