स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.*
1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.*

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.ज्योती सोनवणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची भूमिका एक शास्त्रज्ञ,भारताच्या क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांना लक्षणीयरीत्या केलेले योगदान, त्यांच्या सरकारी भूमिकांव्यतिरिक्त, ते एक प्रभावशाली शिक्षक, लेखक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाणारे एक व्यक्तिमत्व होते, ज्यामुळे त्यांना “लोकांचे राष्ट्रपती” ही पदवी मिळाली.त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांच्या विकासात आणि भारताला अणु क्लबमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैयक्तिक पातळीवर मदत करण्यासाठी वेळ काढत असत.असे त्यांनी सांगितले.तसेच 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिवस , वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन म्हणुन साजरा केला जातो असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. संदिप वानखेडे, व समितीचे सदस्य प्रा. पुजा सायखेडे , प्रा. सुरेश शिंदे, प्रा उमेश ठाकरे, प्रा दिपक चौधरी,यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *