प्रताप महाविद्यालयाचे ‘युवारंग युवक महोत्सव’ स्पर्धेत यश* —————————————— ● नृत्यकलेत चॅम्पियनशिप ट्रॉफी ● एकूण २६ पदके पटकावून प्रताप महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा ! ● खा.शि.मंडळाचे विशेष सहकार्य
![]()
*प्रताप महाविद्यालयाचे ‘युवारंग युवक महोत्सव’ स्पर्धेत यश*
——————————————
● नृत्यकलेत चॅम्पियनशिप ट्रॉफी
● एकूण २६ पदके पटकावून प्रताप
महाविद्यालयाने रोवला मानाचा
तुरा !
● खा.शि.मंडळाचे विशेष सहकार्य
———————————————–
अमळनेर प्रतिनिधी- खांनदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांनी यंदाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव आयोजित *युवारंग युवक महोत्सवात* कलात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाविद्यालयाने “ *नृत्यकलेची चॅम्पियनशिप ट्रॉफी* ” पटकावत आपले कलात्मक व सांस्कृतिक वर्चस्व सिद्ध केले आहे,विद्यार्थ्यांनी विविध कलात्मक स्पर्धांमध्ये सहभाग घेत एकूण ५ पारितोषिके ज्यामध्ये २६ पदके (सुवर्ण, रौप्य व कांस्य) मिळवून प्रताप महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.
*युवारंग स्पर्धे मधिल यश*
——————————–
🏅 प्रहसन (नाट्य प्रकार) – प्रथम क्रमांक (६ सुवर्णपदके)
🏅 समूह नृत्य (फोक डान्स) – प्रथम क्रमांक (१० सुवर्णपदके)
🏅 रांगोळी स्पर्धा – प्रथम क्रमांक
(१ सुवर्णपदक)
🥈 लोकसंगीत स्पर्धा – द्वितीय क्रमांक
(८ रौप्यपदके)
🥉 कोलाज (चिकटकला) – तृतीय
क्रमांक (१ कांस्यपदक)
या सर्व विजयानंतर प्रताप महाविद्यालयाला यंदाच्या महोत्सवात प्रतिष्ठेची “नृत्यकलेची चॅम्पियनशिप ट्रॉफी” बहाल करण्यात आली.
प्रस्तुत यशामुळे संपूर्ण अमळनेर शहरात विद्यार्थ्यांचे स्वागत होत आहे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.जितेंद्रजी झाबक, उपाध्यक्ष जितेंद्रजी देशमुख,श्रीमती माधुरीताई पाटील, विश्वस्त सौ.वसुंधराताई लांडगे, कार्याध्यक्ष मा.डॉ. संदेशजी गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी.ए.नीरजजी अग्रवाल,जेष्ट संचालक अण्णासाहेब हरी वाणी,श्री.योगेशजी मुंदडे, भैय्यासाहेब विनोद पाटील, श्री.प्रदीपजी अग्रवाल, बापूसाहेब कल्याण पाटील, चिटणीस प्रा.पराग पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.हर्षवर्धन डी जाधव, प्राध्यापक प्रतिनिधी दिनेश भलकार,कुलसचिव राकेश निळे,वरिष्ठ लिपिक भटू चौधरी, देवेंद्र कांबळे, सर्व उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर बंधूनी विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे, समर्पणाचे व सृजनशीलतेचे मनःपूर्वक कौतुक केले.
त्यांनी नमूद केले की, विद्यार्थ्यांचे टीमवर्क, नृत्यनिपुणता, रंगकला आणि सादरीकरण कौशल्यामुळे हे यश शक्य झाले आहे.
या यशातील एक हृदयस्पर्शी प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे,
महाविद्यालयाच्या प्रहसन संघातील अक्षर ठाकरे या विद्यार्थ्याच्या आईचे सरावाच्या काळात अपघाती निधन झाले. तरीही या विद्यार्थ्याने दुःखावर मात करत संपूर्ण टीमसह आपले सादरीकरण पूर्ण केले आणि सुवर्णपदक पटकावत आईला श्रद्धांजली म्हणून विजय अर्पण केला.
या प्रसंगाने संपूर्ण महाविद्यालयाला प्रेरणादायी संदेश दिला की,कला केवळ स्पर्धा नसून ती मनोधैर्य, संस्कार आणि श्रद्धेची अभिव्यक्ती आहे
प्रस्तुत अभूतपूर्व यशामुळे प्रताप महाविद्यालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की,खानदेश शिक्षण मंडळाची शैक्षणिक परंपरा, संस्कृती, आणि कलात्मक मूल्ये ही फक्त गुणवत्तेपुरती मर्यादित नसून, ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वात तेज पेरणारी आहे.
प्रताप महाविद्यालयाने युवारंग युवक महोत्सवात सादर केलेली कला ही केवळ स्पर्धा नव्हे, तर *कलेतून संस्कार*’ हा संदेश देणारी ठरली आहे.
प्रस्तुत युवारंग युवक महोत्सव स्पर्धेत सिनेट सदस्य डॉ.संदीप नेरकर, सांस्कृतिक प्रमुख डॉ.योगेश तोरवणे,प्रा.नितीन पाटील,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.तुषार रजाळे,सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी तथा संघ व्यवस्थापक डॉ.रवी बाळसकर,महिला संघ व्यवस्थापक डॉ.नलिनी पाटील,सहाय्यक महिला विकास अधिकारी डॉ.वंदना भामरे,प्रा.दिलीप तडवी आदींनी सहकार्य केले आहे.

