प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर
1 min read

प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर

Loading

प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदार यादीसंबंधी महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. माजी उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे यांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी, नितीन मुंडावरे अमळनेर यांच्या समोर अर्ज दाखल करून मतदार यादीतील दुरुस्तीची मागणी केली आहे.
लांबोळे यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, प्रभाग क्र. 18 च्या मूळ चतुसिमेनुसार असलेले काही मतदार चुकीने प्रभाग क्र. 12, 13 व 17 मध्ये समाविष्ट झाले आहेत. यामुळे त्या मतदारांना त्यांच्या मूळ प्रभागातील मतदानाचा हक्क बजावण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.

अर्जात नमूद केल्याप्रमाणे —
1️⃣ प्रभाग क्र. 12 मधील मतदार यादीतील काही नावे प्रभाग क्र. 18 मध्ये समाविष्ट करावीत.
2️⃣ प्रभाग क्र. 13 मधील चुकीने समाविष्ट झालेली नावे प्रभाग क्र. 18 मध्ये स्थानांतरित करावीत.
3️⃣ प्रभाग क्र. 17 मधील काही मतदारांची नावे देखील प्रभाग क्र. 18 मध्ये असणे अपेक्षित आहे.

यासंदर्भात लांबोळे यांनी संबंधित मतदारांची यादी, अनुक्रमांकांसह यादी क्रमांक 1 ते 3 स्वरूपात पुराव्यादाखल सादर केली आहे.
त्यांनी नम्र विनंती केली आहे की अमळनेर नगरपरिषदेकडून जाहीर केलेल्या अधिकृत चतुसिमा नुसार मतदार यादीत आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, जेणेकरून योग्य मतदारांना त्यांच्या प्रभागात मतदानाचा अधिकार वापरता येईल.
या निवेदनावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
अमळनेर परिसरात या विषयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगत असून, प्रभाग सीमारेषेतील गोंधळ दूर करून पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *