दुःखद निधन : अंतुर्ली गावातील वंदनाबाई पाटील यांचे अकस्मात निधन, संपूर्ण तालुक्यात हळहळ
![]()
दुःखद निधन : अंतुर्ली गावातील वंदनाबाई पाटील यांचे अकस्मात निधन, संपूर्ण तालुक्यात हळहळ
अमळनेर प्रतिनिधी– अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली गावात एक दुर्दैवी घटना घडली. गावातील सुप्रसिद्ध रहिवासी, कै. सौ. वंदनाबाई संजय पाटील (वय ४७) यांचे शेतात पायी जात असताना अचानक निधन झाले. त्या नुकत्याच काशीयात्रा करून घरी परतल्या होत्या, अशा दु:खद प्रसंगाने संपूर्ण गावकऱ्यांना स्तब्ध केले आहे.
त्या आपल्या पश्चात पती संजय आसाराम पाटील, एक मुलगी, एक मुलगा आणि सासू यांचा परिवार सोडून गेल्या आहेत. त्या सौ. पी. एन. मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी राहुल अरुण पाटील यांच्या सासू होत्या. त्यांच्या कार्यशील, प्रेमळ आणि संस्कारी व्यक्तिमत्त्वामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांचे स्मरण कायम राहणार आहे.
त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात असून, स्थानिक तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या आत्म्यास शांती प्रार्थना केली आहे.

