अभिनंदन! सुवर्णकन्या मोहिनी खलाणे यांचा पुण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य सत्कार
1 min read

अभिनंदन! सुवर्णकन्या मोहिनी खलाणे यांचा पुण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य सत्कार

Loading

अभिनंदन! सुवर्णकन्या मोहिनी खलाणे यांचा पुण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य सत्कार

अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते कुमारी मोहिनी खलाणे यांचा पुणे येथे भव्य सत्कार करण्यात आला. मोहिनी खलाणे हिने सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात M.Sc. मध्ये प्रथम स्थान मिळविले असून, तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाप्रमाणे दोन सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.
या ऐतिहासिक कामगिरीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांनी व्यक्तिशः सत्कार केला. महानगरपालिका हायस्कूल तर्फे कु. मोहिनी खलाणे यांना हार्दिक अभिनंदन व्यक्त केले असून, त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल कौतुक व्यक्त करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंब, शिक्षकवर्ग आणि शिक्षणसंस्थेला अभिमान वाटतो.
सेवानिवृत्त शिक्षक श्री संजय जी खलाणे, विज्ञान शिक्षक आणि त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन या यशामागील प्रमुख कारण असल्याचे नमूद केले जाते. सुवर्णकन्या मोहिनी खलाणे यांचे हे यश पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *