अमळनेर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत जाहीर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित
![]()
अमळनेर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत जाहीर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित
अमळनेर प्रतिनिधी – नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, अमळनेर येथे दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या तरतुदीनुसार पंचायत समिती, अमळनेर क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षणासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या विशेष सभेस मा. श्री. संजय बागडे, सोडत सभा अध्यक्ष तसेच उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली.
सदर सभेला उपस्थित होते श्री. रुपेशकुमार सुराणा, प्राधिकृत अधिकारी व तहसिलदार, अमळनेर, श्री. प्रशांत धमके, निवडणूक नायब तहसिलदार, श्री. अजय कुलकर्णी, महसूल नायब तहसिलदार, श्रीमती रुपाली अडकमोल, अ.का., तसेच कर्मचारी श्री. प्रदीप महाले, श्री. किशोर साळुंके, श्री. सचिन निकम व श्री. अक्षय सातपुते.
सोडत प्रक्रियेत कु. विराट शुभम शिंदे (वय १०) यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यानुसार, आरक्षण खालीलप्रमाणे ठरले: कळमसरे – अनुसूचित जमाती (महिला), प्र. डागंरी – अनुसूचित जमाती, अमळगाव – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, पातोंडा – अनुसूचित जाती (महिला), दहिवद – सर्वसाधारण, सारबेटे बु – सर्वसाधारण, मुडी प्र.डा – सर्वसाधारण (महिला), मांडळ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), मंगरुळ – सर्वसाधारण (महिला) व जानवे – सर्वसाधारण.
सदर सोडत प्रक्रियेत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचा मार्गदर्शन व सहकार्यामुळे सर्व आरक्षण नीट पद्धतीने पार पडले. या सभेच्या आयोजनामुळे पंचायत समिती निवडणुकीसाठी नियमानुसार आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पूर्ण झाली आहे.

