मराठी भाषा सप्ताहात “आजच्या पिढीची मराठी भाषा परिसंवादाचे आयोजन
1 min read

मराठी भाषा सप्ताहात “आजच्या पिढीची मराठी भाषा परिसंवादाचे आयोजन

Loading

*मराठी भाषा सप्ताहात “आजच्या पिढीची मराठी भाषा परिसंवादाचे आयोजन*

*अकोला* — अकोला जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.यादरम्यान विविध विषयांवरील परिसंवाद व वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.”नव्या पिढीची मराठी भाषा” या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी शासनाच्या साहित्त्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य व लोकस्वातंत्र्य पदाधिकारी पुष्पराज गावंडे तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी नव्या पिढीची मराठी भाषा या विषयावर बोलतांना वाचन,पत्रलेखन आणि सामाजिक संवाद या विषयापासून युवापिढी दुर असल्याने मराठी भाषेपासून दुरावत आहे.याला कारणीभूत मोबाईल तंत्रज्ञान आणि मराठी वाचनाचा अभाव जबाबदार असून, युवा पिढीकडून पुस्तके तर दुरच दररोजची वृत्तपत्र सुद्धा वाचली जात नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे.त्यामुळे शाळेतून शिक्षक आणि घरातून आई वडीलांनी त्यांना वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजे.असे विचार यावेळी पुष्पराज गावंडे व संजय देशमुख यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास ग्रंथालय संघाचे विभागीय अध्यक्ष प्रभाकर घुगे,रामभाऊ मुळे,जिल्हाध्यक्ष शामराव वाहूरवाघ, हे सुध्दा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुलभाऊ वानखडे ,कोलते,गव्हाळे
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सागर लोडम,फुलचंद वानखडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संचलन मनोज देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन कोलते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *