आयएमआरडी परिसंस्थेत बी.बी.ए व बी.एम.एस प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम संपन्न
1 min read

आयएमआरडी परिसंस्थेत बी.बी.ए व बी.एम.एस प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Loading

आयएमआरडी परिसंस्थेत बी.बी.ए व बी.एम.एस प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम संपन्न

 

शिरपूर : येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट परिसंस्थेतील पदवी अभ्यासक्रमातील बी.बी.ए व बी.एम.एस प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम समारोपाच्या दिवशी मुख्य अतिथी म्हणून (बी.बी.ए – 2021) चे माजी विद्यार्थी सौरभसिंग राजपूत (सिनियर प्रॉडक्ट कॉम्पलिअन्स अससोसिएट, ऍमेझॉन) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष परिसंस्थेतील संचालिका डॉ.वैशाली पाटील या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला उपस्थितीत मुख्य अतिथीचा परिचय करून अतिथीचा सत्कार परिसंस्थेतील संचालिका डॉ.वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर डॉ. तुषार पटेल यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे उद्दिष्टे स्पष्ट केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या बदल आपले विचार मांडले. आयएमआरडी परिसंस्थेने विद्यार्थ्यांसाठी केलेले प्रयत्न व विद्यार्थ्यांनी केलेले नवनवीन उपक्रम त्यातून मिळवलेली अचिएव्हमेन्ट यावर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना एक उत्कृष्ट असे विडिओ प्रेसेंटेशन दाखवण्यात आले.तसेच सदर कार्यक्रमात परिसंस्थेतील प्रथम व द्वितीय वर्ष बी.बी.ए व बी.एम.एस च्या २०२४-२०२५ शैक्षणिक वर्षातील ज्या विधार्थ्यानी शैक्षणिक गुणवत्ता यादीत स्थान मिळवले त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्य अतिथी माजी विद्यार्थी सौरभसिंग राजपूत यांनी आजच्या व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उपलब्ध संधी आणि त्यासाठी आवश्यक तयारी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीच्या माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये कसे सुधार करावे, कौशल्ये कशी विकसित करावी आणि भविष्यात आपले करिअर उज्ज्वल करण्यासाठी विचारपूर्वक जोखीम कशी घ्यावी याबाबत प्रोत्साहित केले. तसेच, परिसंस्थेद्वारे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या संधींचा आढावा सादर केला. परिसंस्थेच्या संचालिका डॉ वैशाली पाटील यांनी आपल्या स्पीच द्वारे व्यवसाय क्षेत्रातील बदलते स्वरूप आणि ए.आय तंत्रज्ञानाच्या नवीन प्रवाहांविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणाऱ्या संधींबद्दल सांगितले आणि भविष्यात या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी हे ज्ञान किती उपयुक्त ठरेल हे स्पष्ट केले. त्यांनी विधार्थ्याना परिसंस्था कश्या प्रकारे त्त्यांना सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देते या बदल सांगितले. त्यानंतर प्रथम वर्षाचे विद्यार्थ्यांनी आयोजित इन्डक्शन कार्यक्रमाबाबत आपला अभिप्राय मांडला. त्यांनी कार्यक्रमातील विविध सत्रांचे कौतुक केले व त्यातून मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांचे आत्मविश्वास वाढल्याचे व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले आणि कार्यक्रमाच्या उपयुक्ततेवर भर दिला. सर्वांनी हा कार्यक्रम त्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा ठरल्याचे नमूद केले.
पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्रॅम चे उद्धिष्ट विध्यार्थ्यांना विविध सेशनद्वारे परिसंस्थेतील मार्गदर्शक तत्वे, नैतिक मूल्य या बदल माहिती अवगत करून देणे, तसेच त्यांचा शैक्षणिक प्रवास सुखरूप व्हावा या साठी त्यांना नवीन शैक्षणीक प्रणाली २०२०, परीक्षाव्यवस्था, अभ्यास कौशल्य, संशोधनाचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकास ,एनएसएस, अँटी-रॅगिंग, महिला सुरक्षाविषयी जागृती, उद्योगव्यवस्था, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्लब्स, तणाव व्यवस्थापन, आणि डिजिटल रिसोर्सेस, सांस्कृतिक कार्यक्रम, इंग्लिश डायग्नोस्टिक टेस्ट इत्यादी विषयांसाठी परिसंस्थेद्वारे सेशन आयोजित करून देण्यात आले. तसेच त्यांच्यात संभाषण कौशल्य रुजवावीत या साठी विविध एक्टिविटीज च्या माध्यमातून प्रयन्त करण्यात आले.
सदर पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम ची सुरवात परिसंस्थेतील प्रा दिनेश बोरसे व प्रा कौस्तुभ सावंत यांनी विध्यार्थ्यांसाठी आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी द्वारे केली त्यामुळे विधार्थ्याना मधील भीती दूर झाली. नवीन शैक्षणीक प्रणाली, फॅकल्टी बदल माहिती विधार्थ्याना देण्यात आली. तसेच कोड ऑफ कंडक्ट आणि नैतिक मूल्य याचे महत्व पटवून देण्यात आले. युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅलू या बदल विधार्थ्याना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षा प्रणाली व अध्ययन कौशल्यांत सुधारणा करण्यासाठी माहिती सत्र आयोजित करण्यात आले. स्टडी टेक्निक आणि टाइम मॅनेजमेंटवर प्रॅक्टिकल व प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले गेले.अविष्कार स्पर्धा व संशोधन प्रणाली विषयी विद्यार्थ्यांची विचारसरणी कशी विकसित होईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.व्यक्तिमत्त्व विकास आणि आय. पी. डी. सी. या विषयावर सखोल चर्चा झाली,ज्यात जीवनात आवश्यक असलेल्या पैलूंचा समावेश होता.
राष्ट्रीय सेवा योजना व विविध सर्टिफिकेशन कोर्सेस याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.अँटी-रॅगिंग व महिला सुरक्षिततेवरील नाटिका परिसंस्थेच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर करून प्रमुख नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व जागरूक केले.इंडस्ट्री ट्रेंड्स आणि प्लेसमेंटच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले.वेगवेगळ्या विषयांशी निगडित शैक्षणिक क्लब्स द्वारे द्वितीय व तृतीय वर्ष्यामधील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तर तणाव व्यवस्थापन विषयावर सत्र आयोजित करण्यात आले.लायब्ररी ओरिएंटेशन आणि डिजिटल रिसोर्सेस या बदल विध्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.ऐन पी टी एल व स्वयंम या बदल माहिती प्रस्तुत करण्यात आली.व्यवसाय सल्लागार व उद्योजकता जागरूकता या विषयाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम चर्चा सत्राद्वारे करण्यात आले.स्पोर्ट्स बदल विधार्थ्याना मार्गदर्शन केले गेले. इंग्लिश, ऍप्टिट्यूड डायग्नोस्टिक टेस्ट विधार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली.परिसंस्थेच्या सांस्कृतिक विभागाबद्दल द्वितीय व तृतीय वर्ष्यामधील विधार्थ्यांद्वारे नाटिका व कार्यक्रम सादर करून त्यांना अवगत करण्यात आले.
परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील ,पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ.मनोज बेहरे, आयक्यूएसी समन्वयक व एमएमएस विभागप्रमुख डॉ. मनोज पटेल, तसेच पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी प्रयत्न केले. सदर इंडक्शन प्रोग्रामसाठी परिसंस्थेतील विविध शैक्षणिक क्लब च्या द्वितीय व तृतीय वर्ष्याच्या विधार्थ्यांचे सहकार्य लाभले त्यांनी स्वयंसेवक म्हणून आपले कार्य यशस्वीरीत्या पार पाडले. सदर प्रोग्रॅम साठी डॉ. अमर गौर , डॉ. योगेश सेठिया, प्रा. सचिन सुराणा, प्रा. दिनेश बोरसे, डॉ प्रियंका भंडारी , डॉ. लक्ष्मीकांत शर्मा, प्रा. सुफियान बागवान, प्रा. विजय गर्गे , प्रा. कौस्तुभ सावंत, डॉ. रुपाली अग्रवाल , प्रा. मिलिंद पाटील , प्रा. अश्विनी सोनवणे ,प्रा. ज्योति गोराणे प्रा. सपना ईशी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *