मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व
1 min read

मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व

Loading

मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व

अमळनेर प्रतिनिधी
जीवनात संघर्ष येतच असतात, पण काही माणसं या संघर्षावर मात करून लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. मंगरूळचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील म्हणजेच सर्वांच्या लाडक्या बापू सर यांचा हा प्रवास म्हणजे समाजासाठीच्या अखंड सेवाभावाचा आणि आत्मविश्वासाचा उत्तम आदर्श आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासणारे कुटुंब-

प्रकाश पाटील यांच्यावर अनेक संकटे आली, परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. प्रत्येक प्रसंगी त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि लोकांच्या मनात आपल्या प्रेमळ, सहृदय स्वभावाने सहानुभूती व सन्मान मिळवला.
सुख असो वा दुःख, प्रत्येक प्रसंगी त्यांची उपस्थिती असते — मग कोणाचा वाढदिवस असो, निवड असो किंवा कुणाचा सन्मान सोहळा असो.
कारण सन्मान करण्यासाठी मोठेपणा लागतो — आणि तो मोठेपणा त्यांच्या स्वभावातच आहे.
मागील वर्षी त्यांच्या मुलाच्या विवाहप्रसंगी दिग्गज मान्यवरांची उपस्थिती हेच दाखवून देते की, ते इतरांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी राहतात. त्यांच्या पत्नींचा प्रत्येक कार्यात विशेष सहभाग असतो. त्यांचा संपूर्ण परिवार — भाऊ, वहिनी आणि आप्तेष्ट — हे सर्व समाजाशी नाळ जपणारे, बांधिलकीची परंपरा पुढे नेणारे आहेत.
त्यांचे आई-वडिलांचे आशीर्वाद त्यांच्यासाठी आजही प्रेरणादायी आहेत. प्रकाश सर म्हणतात —

“लोकांना काय वाटतं यापेक्षा, आपल्याला जे योग्य वाटतं ते करत राहायचं — म्हणूनच मी नेहमी आनंदी असतो.”

कार्यकुशलता आणि नेतृत्वगुण-

अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातून उगवलेले प्रकाश पाटील आज शिक्षण क्षेत्रातील उज्ज्वल नाव ठरले आहेत.
शिक्षक, मार्गदर्शक, आणि समाजकारणी या तिन्ही भूमिकांमध्ये त्यांनी समान प्रामाणिकपणा दाखवला आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कामाची दिशा नेहमीच गुणवत्तेच्या आणि सेवाभावाच्या दिशेने राहिली आहे.

संघर्षशीलता आणि समाजकार्य-

विनाअनुदानित शाळांच्या समस्या असोत, जुनी पेन्शन योजना असो वा शिक्षकांचे प्रश्न — प्रत्येक चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. न्यायालयीन लढा असो की आंदोलन, बापू सर नेहमी आघाडीवर राहिले.
आपल्या जन्मगावात वाचनालय स्थापन करून त्यांनी वाचनसंस्कृतीला चालना दिली आहे. विविध संघटनांमध्ये जबाबदारी सांभाळताना त्यांचा संवादकौशल्य, नम्रता आणि आनंदी स्वभाव कायमच उजळून दिसतो.

सुखी आणि समाधानी परिवार-

पी.बी. पाटील सरांना दोन मुले आहेत. मुलगा भारतीय नेव्हीमध्ये कार्यरत असून देशसेवेत व्यस्त आहे — देशभक्तीचे हे बाळकडू त्याला वडिलांकडूनच मिळाले आहे. मुलगी बी.फार्मसी चे शिक्षण प्रताप महाविद्यालयात घेत आहे.
त्यांची धर्मपत्नी म्हणजे त्यांच्या आयुष्याची सावली — खंबीर, समजूतदार आणि सहकार्यशील. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज प्रकाश सर जनमानसात आपली किर्ती आणि आदराचे स्थान मिळवून आहेत. सुनबाई विद्याविभूषित व प्रेमळ परिवारावर प्रेम करणारी आहे..

कदम ऐसा चलो की निशान बन जाये,
काम ऐसा करो की पहचान बन जाये,
जिंदगी तो सभी जी लेते हैं,
मगर जियो तो ऐसी की मिसाल बन जाये!

प्रकाश पाटील सर हे केवळ मुख्याध्यापक नाहीत, तर मानवतेच्या शिक्षणाचे प्रतीक आहेत.
“आपण समाजासाठी आहोत, समाज आपल्यासाठी नाही” — ही त्यांची भूमिका त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते. त्यांच्या मित्रत्व, उदारता आणि नेतृत्वगुणांमुळे ते सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहोत —
संत गजानन महाराज त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अधिकाधिक कार्यक्षमता लाभो!
त्यांचे जीवन सदैव आनंद, आदर आणि समाजसेवेने बहरलेले राहो — हीच मनःपूर्वक प्रार्थना.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शब्दसंकलन
– ईश्वर आर. महाजन, पत्रकार
📞 9860352960
9766939950

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *