संवाद हाच व्यक्तिमत्व विकासाचा पाया* डॉ.वासुदेव वले (पाचोरा) यांचे प्रतिपादन
![]()
.
*संवाद हाच व्यक्तिमत्व विकासाचा पाया*
डॉ.वासुदेव वले (पाचोरा) यांचे प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर आणि राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाच्या वतीने *अभिजात भाषा पंधरवडा* निमित्ताने आयोजित अतिथी व्याख्यानमालेचा दुसरा दिवस डॉ. वासुदेव वले यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत करण्यात आले होते.
आपल्या प्रभावी भाषणात प्रा.वासुदेव वले म्हणाले की, “संवाद हाच व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे,आजच्या युगात यंत्र भाषेपेक्षा व्यक्तींचा संवाद अधिक महत्त्वाचा ठरतो.” ते पुढे म्हणाले की, “जे बोलतात त्याचे बोंड विकले जातात आणि जे बोलत नाहीत त्याचे गहू सुद्धा विकले जात नाहीत. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात माणूस जोडण्यासाठीच नव्हे, तर त्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संवादाची आवश्यकता आहे.”
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच. डी. जाधव यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी संवादकौशल्य आत्मसात करून व्यक्तिमत्वाच्या घडणीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. त्यांनी ‘अभिजात भाषा पंधरवडा’ या उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट करत मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोपाल बडगुजर यांनी केले तर अतिथींचा परिचय प्रा.तुषार पाटील यांनी केले आणि शेवटी आभार प्रा.सागर सैंदाणे यांनी मानले.प्रस्तुत समारंभ प्रसंगी डॉ. रमेश एन माने, डॉ.विलास गावीत, प्रा. योगेश पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

