अमळनेरमध्ये सामाजिक जाणिवेचे सुंदर उदाहरण — माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी मान्यवरांचा स्नेहभोजन सोहळा
![]()
अमळनेरमध्ये सामाजिक जाणिवेचे सुंदर उदाहरण — माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी मान्यवरांचा स्नेहभोजन सोहळा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहर नव्हे तालुक्यात सामाजिक कार्याची नितांत जाणीव ठेवून कार्यरत असलेले माजी नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नाताई पाटील हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांचा सामाजिक संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
नुकत्याच अमळनेर तालुका मराठा समाजतर्फे मराठा मंगल कार्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान व समाजभूषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने विविध मान्यवरांनी पाटील दांपत्यांच्या वडचौक येथील निवासस्थानी स्नेहभोजनास हजेरी लावली.
या प्रसंगी कॅबिनेट मंत्रीदर्जा मा.आ. नरेंद्रभाई अण्णासाहेब पाटील, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार श्री अनिलदादा पाटील, पारोळा आमदार श्री अमोलदादा पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या स्नेहभेटीनंतर विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विकास विषयांवर मैत्रीपूर्ण चर्चा झाली. कार्यक्रमात मराठा समाजाचे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनाबद्दल माजी नगरसेवक विक्रांत पाटील व स्वप्नाताई पाटील यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

