जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश
1 min read

जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश

Loading

जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील साने गुरूजी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. एस. डी. देशमुख यांची सुकन्या, कु. डॉ. वेदांती सतिष देशमुख यांनी आपल्या कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या प्रयत्नांमुळे पीजी नीट (NEET PG) परीक्षेत उत्तुंग यश मिळवले असून, MS (Gynaecology) मध्ये एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे प्रवेश मिळविला आहे. तिच्या या यशामागे केवळ तिचा स्वतःचा परिश्रम नव्हे, तर कुटुंबाचे मार्गदर्शन, आजी-आजोबा आणि गुरुजन व शिक्षकांचा आशिर्वाद ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कु. वेदांती यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण साने गुरूजी विद्यामंदीर, माध्यमिक शिक्षण साने गुरूजी कन्या हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण प्रताप कॉलेज मध्ये पूर्ण केले. १२ वी मध्ये Physics विषयात नाशिक बोर्डात प्रथम स्थान मिळवणे ही त्यांची शैक्षणिक क्षमता दाखवते. या पार्श्वभूमीवर त्यांनी कठोर परिश्रम करून नीट PG परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले आणि MS (Gynaecology) मध्ये प्रवेश मिळवला.
वेदांतीच्या या यशामुळे तिच्या परिवारापासून शिक्षक, मित्रपर्यंत सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिचे हे यश तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे, जे दाखवते की जिद्द, चिकाटी, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांमुळे कोणताही शिखर गाठता येऊ शकते. कु. डॉ. वेदांती देशमुखच्या या यशामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण झाला असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मराठी लाईव्ह न्युजकडून कु. डॉ. वेदांती देशमुख यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत उज्ज्वल यशाच्या शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *