कळमसरेतील पार्वताबाई शर्मा यांचे निधन आज दुपारी 2 वाजता कळमसरे येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
![]()
कळमसरेतील पार्वताबाई शर्मा यांचे निधन
आज दुपारी 2 वाजता कळमसरे येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे (ता. अमळनेर) येथे आदरणीय श्रीमती पार्वताबाई शर्मा (वय ८५) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्या श्री रामदेव शर्मा महाराज यांच्या मातोश्री होत.
स्वभावाने त्या अत्यंत मितभाषी, प्रेमळ, संयमी व धर्मनिष्ठ होत्या. आयुष्यभर त्यांनी कुटुंबप्रेम, सच्चेपणा आणि नम्रतेचे उदाहरण घालून दिले. त्यांचा समाजातील वावर आदर्शवत होता. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्ययात्रा आज बुधवारी दुपारी 2 वाजता कळमसरे येथील राहत्या घरून निघणार आहे.
मराठी लाईव्ह न्युज तर्फे स्व. पार्वताबाई शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो

