मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ कार्यक्रम
![]()
मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ अमळनेरतर्फे सेवा सप्ताह निमित्ताने *‘मेंटल हेल्थ मॅटर्स’* या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ व प्रेरणादायी वक्ते डॉ. आदित्य महेश्वरी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन ६ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता PBA इंग्लिश मेडीयम स्कूल , अमळनेर येथे करण्यात आले होते.
या वेळी मानसिक आरोग्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांमध्ये ताण-तणाव नियंत्रण, आत्मविश्वास वृद्धी आणि सकारात्मक विचारसरणी कशी विकसित करावी याबाबत डॉ. महेश्वरी यांनी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले.
त्यांनी उदाहरणांसह सांगितले की, “मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकंच महत्त्वाचं आहे. स्वतःला वेळ देणं, संवाद साधणं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.”
कार्यक्रमात लायन्स क्लब अध्यक्ष संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, मुखध्यापक जिजाबराव देवरे, यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
‘We Serve’ या भावनेतून लायन्स क्लबने हा सामाजिक उपक्रम राबवून समाजात मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेचा संदेश दिला.

