राष्ट्रविकास संस्थेमार्फत एलआरए व पीटीओ चे प्रशिक्षण कार्यक्रमाची गावपातळीवर सुरुवात*
![]()
*राष्ट्रविकास संस्थेमार्फत एलआरए व पीटीओ चे प्रशिक्षण कार्यक्रमाची गावपातळीवर सुरुवात*
अमळनेर प्रतिनिधी
न्यू जनरेशन पाणलोट विकास प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या अंतर्गत अमळनेर तालुक्यातील 9 गावात पाणलोट विकास प्रकल्प सुरु आहे त्यामध्ये क्षमता बांधणी घटकांतर्गत प्रकल्प प्रशिक्षण संस्था( पीटीओ)व उपजीविका संसाधन संस्था ( एलआरए) म्हणून प्रशिक्षण संस्था म्हणून राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर या संस्थेची निवड झाली आहे. त्यामध्ये वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य व जलसंधारण विभाग जळगाव यांच्या सहकार्यातून सदर प्रशिक्षण घेण्यात येत आहे यामध्ये जल व भुमी व्यवस्थापन संस्था छ.संभाजीनगर यांनी संस्थेचे प्रविण प्रशिक्षक तयार केलेले प्रविण प्रशिक्षक यांच्याकडुन प्रशिक्षण देण्यात येत आहेत. सदर प्रशिक्षणात गावातील , सरपंच पाणलोट समीती अध्यक्ष , सचिव व सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, बचतगट सदस्य, शेतकरी उत्पादक संस्था अध्यक्ष व सचिव, शेतकरी गट अध्यक्ष व सदस्य, शेतकरीवर्ग यांना गावपातळीवर प्रशिक्षण भिलाली, एकतास, एकलहरे, पाडसे, शहापूर, कळमसरे, निम, तांदळी, खेडी, खर्दे, वासरे या गावात सदर प्रशिक्षण देण्यात येत आहेत त्यामध्ये जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक मा.श्री.बी.एस.ढंगारे साहेब,जिल्हा समन्वयक श्री पुरुषोत्तम पाटील,पीआयए तथा तालुका कृषी अधिकारी मा.श्री. ठाकरे साहेब व पाणलोट पथक सदस्य( डब्लुडीटी) विनोद पाटील, मच्छिंद्र सोनवणे यांच्याकडुन सहकार्य मिळत आहे. सदर प्रशिक्षण हे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.भुपेन्द्र महाले यांच्या नियोजनानुसार प्रशिक्षण सुरु आहे यामध्ये प्रशिक्षक म्हणून राष्ट्रविकास संस्थेमार्फत संस्थचे सचिव तुषार पाटील, सुशिल केदारे, अमोल बैसाणे, सिमा महाजन, किशोर बागुल, विद्या पाटील, मनिषा बैसाणे, संदिप बेलेकर,दिपक वाघ विजय पाटील यांच्यामार्फत देण्यात येत आहेत तर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून नयना चौधरी, राहुल पाटील, सुमेध खरे, संप्निल पाटील, हिलाल पाटील, गोरख पाटील,मुकेश पाटील,महेश माकडे हे सदर प्रशिक्षणाचे नियोजन करीत आहेत

