आर्य अष्टांग मार्ग अनुसरल्यास जीवन आनंदाचा सोहळा – *भंते प्रज्ञा बोधी*
![]()
*आर्य अष्टांग मार्ग अनुसरल्यास जीवन आनंदाचा सोहळा –
*भंते प्रज्ञा बोधी*
माणूस आणि त्यांच जगणं सर्वांग सुंदर करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेली चार अष्टांग मार्ग माणसाने त्याच्या जीवनात अंगीकारल्यास त्याचे जीवन आनंदाचा सोहळा आहे असे मत मा गौतमी महिला संघ यांनी आयोजित केलेल्या वर्षावासानिमित्तच्या कार्यक्रमात भंते प्रज्ञा बोधि यांनी मनोगत व्यक्त करताना मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल होते.
भंते प्रज्ञा बोधी याप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले संस्कार आणि त्या संस्काराची महती कुटुंबात ज्या विचारांनी संस्कारित करायला हवी ते विचार निश्चितपणे तथागतांच्या धम्मामध्ये दिसून येतात माणसाच्या जगण्याला आणि त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाला नवनवे विचार एक सूत्रता व्यापकता विनयता आणि स्त्री पुरुष समानतेची शिकवणूक या सर्व गोष्टी बुद्धाच्या धम्मामध्ये आढळून येतात आणि हा धम्मच आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकतो असेही त्यांनी याप्रसंगी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. मिलिंद बागुल यांनी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दिलेला धम्म विचार हा माणसाच्या माणुसकीचा, त्याच्या जगण्याचा आणि सर्वांना जागविण्याचा, त्याला इतरांच्या सुखदुःखाची जाणीव करून देणारा आणि माणसाला माणसाच्या जवळ आणणारा असून बुद्धाचा धम्म हा जगाने अनुसरलेला धम्म आहे, त्या धम्माला अंगीकारत जगणं सुंदर, सुखद कसं करता येईल याचा ध्यास घेण्याची, युद्धाऐवजी बुद्ध स्वीकारण्याची जगाला गरज असल्याचेही मत त्यांनी याप्रसंगी मांडले.
मॉ गौतमी महिला संघाने वर्षावासानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात येत होते त्या वर्षावासाचा समारोप भंते प्रज्ञा बोधी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मॉ गौतमी महिला संघाच्या संगीता भालेराव ज्योती निकम, सिंधुताई जाधव, पुनम जाधव, निशा सुरवाडे, सोनाली सोनवणे, प्रियंका सुरडकर, कल्याणी पाटील यांनी बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील आणि कार्यक्रमाची सुरुवात केली योगिता पाटील, संगीता कोळी, मीना हिवाळे, आशा सुरळके निर्मला अहिरे, अनिता साळवे, प्रीती वले, शर्माताई, निकिता खंडारे, मनीषा ननवरे, पुनम पारखे, शोभा दांडेकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस भीम गीत, बुद्ध गीत सादर केले.
विनोद निकम, आकाश सोनवणे, सागर सुरडकर, सुनील सुरवाडे, प्रकाश जाधव, भीमराव सोनवणे, मयूर भालेराव, यशवंत पाटील, सरदार पाटील, ईदल परदेशी, भोई नाना, संदीप जाधव, सुमित निकम, आनंद गवई, भैय्यासाहेब बोरसे या सर्व मंडळींनी भंते प्रज्ञा बोधी यांना चिवरदान केले

