डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर
1 min read

डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर

Loading

डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
अमळनेर येथे नवरात्रोत्सव निमित्त क्षत्रिय काच माळी समाज मढीवर महिला आरोग्य संवर्धनासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन रेणुकाई मॅटर्निटी हॉस्पिटल, अमळनेरचे डॉ. सोनल महाजन (चेंडे), स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ, तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, अमळनेर यांनी केले.
शिबिराचे उद्घाटन क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ अमळनेरचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले. यावेळी डॉ. सोनल महाजन यांनी महिलांना स्त्री आरोग्य, मासिक पाळी, प्रेग्नन्सी काळातील काळजी, योग्य आहार, रक्तदाब व साखरेची नियमित तपासणी यासह जीवनशैलीतील बदल कसे आरोग्यसाठी उपयुक्त ठरतात, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली गेली आणि आवश्यक औषधोपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आला.
तसेच, कृष्णा अँनिलिसिस लॅब चे श्री राहुल महाजन व सौ. भावना महाजन यांनी रक्त तपासणी सवलतीच्या दरात करून शिबिराची कार्यक्षमता वाढवली. शिबिर यशस्वी करण्यासाठी रेणुकाई मॅटर्निटी हॉस्पिटल चे कर्मचारी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळच्या सौ. भारती चव्हाण, सौ. अर्चना महाजन, सौ. रंजना महाजन, सौ. चित्रकला महाजन, सौ. माया महाजन, सौ. आशा माळी, सौ. मनिषा महाजन, सौ. मंगल महाजन यांनी कठोर परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला श्री गंगाराम महाजन, श्री बी.आर. महाजन, श्री पांडुरंग माळी, श्री गुलाब बापु, श्री अशोक महाजन, श्री गणेश महाजन, श्री प्रा. सुभाष महाजन, श्री रविंद्र महाजन, श्री मनोहर आप्पा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरातून बहुसंख्य माता-भगिनींना रक्तदाब, साखर, हृदयाचे आरोग्य, प्रेग्नन्सी काळातील सल्ला आणि पोषणविषयक माहिती यांचा लाभ मिळाला, तर महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. उपस्थित महिलांनी आणि आयोजकांनी या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन करण्याची मागणी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *