“भडणे येथील स्वामी समर्थ मंदिरात नवरात्र उत्सव भव्य होम हवन व भक्तिमय कार्यक्रमाने साजरा”
![]()
“भडणे येथील स्वामी समर्थ मंदिरात नवरात्र उत्सव भव्य होम हवन व भक्तिमय कार्यक्रमाने साजरा”
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील ग्रामस्थ व नव तरुणांनी स्वामी समर्थ मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून गावातील दानशूर दात्यांनी व गावकऱ्यांनी व तरुणांनी लोकसहभागातून स्वामी समर्थ मंदिर उभारण्यात येत असल्याने या नवरात्र उत्साहात मंदिराच्या प्रांगणात भव्य व दिव्य असे होम हवन तसेच महापूजा करण्यात आली यावेळी गावातील तरुण महिला भक्त यांनी भाग घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील चिमुकलींनी नवदुर्गाचे विविध प्रकारचे रूप घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी गावातील भाविकांनी मंदिराच्या परिसरात सुशोभीकरण करून विविध प्रकारच्या रांगोळी काढून परिसर सुशोभित करण्यात आला व भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले होते यावेळी गावातील भाविक भक्तांनी होम हवन यज्ञात सहभाग घेऊन लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ भक्तगण व गावकरी यांनी परिश्रम घेतले

