गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन 
1 min read

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन 

Loading

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मितभाषी पण कर्तृत्ववान माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून केली. त्यानंतर मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप घोरपडे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

या प्रसंगी गांधीजींचे सत्याग्रह, अहिंसा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तर शास्त्रीजींचे “जय जवान जय किसान” हे घोषवाक्य व त्यांच्या सादगीपूर्ण जीवनाचा विशेष उल्लेख करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महान नेत्यांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाला पूज्य साने गुरुजी ग्रंथालय वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ, साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप घोरपडे, मराठी वाङ्मय मंडळाचे संचालक व कवी रमेश पवार, अहिराणी साहित्यिक गोकुळ बागुल, साने गुरुजी वाचनालयाचे संचालक बी. एस. जाधव सर तसेच मोठ्या संख्येने वाचकवर्ग उपस्थित होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *