शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन
1 min read

शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन

Loading

शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन

अमळनेर प्रतिनिधी –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून, या शताब्दी वर्षानिमित्त संघ स्वयंसेवकांकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून, संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी विजयादशमी उत्सव अमळनेर तालुक्यात आज (दि. ०२ ऑक्टोबर २०२५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी आयोजित भव्य पथसंचलन म्हसकर प्लॉट येथून सुरू झाले. नेताजी सुभाष चौक, तिरंगा चौक, बस स्टँड, महाराणा प्रताप चौक, स्टेशन रोड मार्गे पुन्हा म्हसकर प्लॉट येथे या संचलनाचा समारोप करण्यात आला.

संचलनात ३०० हून अधिक स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते, तर अनेक स्वयंसेवक मंगलवेशात उपस्थित राहिले. संचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी, फटाके व जयघोषाने स्वागत करून उत्सवात उत्साहाची लहर निर्माण केली.

या प्रसंगी बोलताना जिल्हा प्रचार प्रमुख डॉ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ही सुरुवात आहे. पुढील काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यक्रम राबवले जातील. संघाची प्रेरणा ही राष्ट्रभक्ती व समाजसेवा आहे, आणि त्याचे दर्शन आजच्या संचलनातून घडले.”
अमळनेर तालुक्यातील या संचलनामुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *