व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!*
1 min read

व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!*

Loading

*व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!*

अमळनेर येथील कै.श्री.दादासाहेब. व्हि.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये दि:30/09/025 मंगळवार नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या पोशाखात आपले गरबा नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यात शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी सुध्दा आनंदाने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरवात संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्या नंतर दुर्गामातेची मनोभावे आरती व पूजन करण्यात आले. आरतीचा मान शाळेच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते व सर्व शिक्षक वृदांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सुंदर गरबा नृत्य सादर करून उपस्थित नागरिक आणि पालकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नीतू शेलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका प्रतीक्षा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मनीषा सोनार, कविता पाटील,संगीता पाटील,योगिता फालके, मनीषा ठाकूर,रोशनी महाजन,प्रियंका महाले,जया परदेशी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सविता चौधरी व भाग्यश्री पाटील यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *