धरणगांवला शास्त्रीजींच्या स्मारकाची दुरावस्था… प्रशासन निद्रिस्त
![]()
शास्त्रीजींच्या स्मारकाची दुरावस्था… प्रशासन निद्रिस्त
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव — येथील कोट बाजार परिसरात असलेल्या शास्त्री मार्केट मधील लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकाची झालेली दुरावस्था याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाहीये.
देशाचे माजी प्रधानमंत्री, अतिशय त्यागी व्यक्तिमत्व, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं ज्यांचं जीवन होतं त्या शास्त्रीजींची आज जयंती. ज्या माणसाने “जय जवान जय किसान” म्हणत देशाचे सर्वोच्च पद अगदी साधेपणाने सांभाळलं त्या महापुरुषांचे स्मारक आपल्या धरणगाव शहरातील शास्त्री मार्केट परिसरात आहे. या स्मारकची झालेली दुरावस्था बघून प्रचंड वेदना झाल्या. खरं म्हणजे सर्व राष्ट्रपुरुषांनी देशासाठी प्रचंड त्याग आणि समर्पण केलंय. त्यांची स्मारकं व्यवस्थितपणे सांभाळता येत नसतील तर फक्त पोकळ प्रेमाचा बळेजाव तरी कशाला करावा हा खरा यक्षप्रश्न आहे. शास्त्रीजींच्या स्मारकाची झालेली दुरावस्था, घाणीचे साम्राज्य बघून प्रचंड वेदना झाल्या. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कोणत्याही महापुरुषांच्या स्मारकाच्या बाबतीत कुचराई केली तर खपवून घेतले जाणार नाही.
*फोटो साभार — सुनिल घनशाम सोनार (वैचारिक स्नेही)*
लक्ष्मणराव पाटील
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धरणगाव

