कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली”….*
![]()
*कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली”….*
अमळनेर प्रतिनिधी
“2 ऑक्टोंबर गांधी जयंती” जगभरात हा दिवस “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” म्हणून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन मा. श्री.उत्कर्ष पवार, सचिव सौ.अलका पवार व उपाध्यक्ष मा.श्री उमाकांत पाटील उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांनी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. त्यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी गांधीजीच्या जीवनावर आधारित विविध प्रेरणादायी भाषणे सादर केली तर काहींनी ‘बापूजींवर’ कविता सादर केल्या.
अध्यक्ष महोदय यांनी गांधीजींच्या महान कार्यांवर प्रकाश टाकला.यावेळी प्राचार्या, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गांधीजीच्या सत्य व अहिंसा या मूल्यांची माहिती देत कार्यक्रमाचा समारोप केला.

