आर.सी.पटेलआय.एम.आर.डी. परीसंस्थेतील बी.एम.एस च्या विद्यार्थ्यांचे सुयश.
![]()
आर.सी.पटेलआय.एम.आर.डी. परीसंस्थेतील बी.एम.एस च्या विद्यार्थ्यांचे सुयश.
शिरपूर प्रतिनिधी:
(वेदांत माळी)
(गौरव पाटील)
शिरपूर- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष बी.एम.एस च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलीत आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील बी.एम.एस च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरीची परंपरा पुढे चालवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत २०२५ मधील बी.एम.एस प्रथम वर्षामधून परीसंस्थेतील बारी नंदिनी दीपक हिने 9.55 सी.जी.पी.ए व 82.82% मिळवुन परिसंस्थेत प्रथम क्रमांक, बारी योगेश्वरी हिरालाल हिने 9.55 सी .जी .पी.ए व 82.45 % मिळवुन परिसंस्थेत द्वितीय क्रमांक ,देवरे ऋतुजा रवींद्र हिने 9.50 सी .जी .पी.ए व 81.73% मिळवुन परिसंस्थेत तृतीय क्रमांक, फुलारी मानसी नितीन हिने 9.18 सी.जी.पी.ए व 76.36% मिळवून परिसंस्थेत चतुर्थ क्रमांक, माळी तेजस्विनी बापू हिने 9.14 सी.जी.पी.ए व 76.36% मिळवून परिसंस्थेत पाचवा क्रमांक, पाटील भावेश रावसाहेब याने 8.91 सी.जी.पी.ए व 75.55% मिळवून परिसंस्थेत सहावा क्रमांक, मोरे मोना दीपक हिने 8.82 सी.जी.पी.ए व 74.82% मिळवून परिसंस्थेत सातवा क्रमांक, चव्हाण हिमांगी प्रमोद हिने 8.68 सी.जी.पी.ए व 72.55% मिळवून परिसंस्थेत आठवा क्रमांक, रमोळे दीपाली विलास हिने 8.59 सी.जी.पी.ए व 72.91% मिळवून परिसंस्थेत नववा क्रमांक, सावंत दीपिका चंद्रशेखर हिने 8.59 सी.जी.पी.ए व 70.64% मिळवून परिसंस्थेत दहावा क्रमांक मिळविला.
आय.एम.आर.डी. परिसंस्थेत अभ्यासक्रम त्यासोबत करिअर गाईडन्स,स्कील डेव्हलपमेंट, सेल्फ मोटीवेशन व जागतीक स्तरावर उपलब्ध नोकरीच्या संधी या विषयी विविध वेबीनार, गेस्ट लेक्चर मधुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामूळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होण्यास मदत झाली. विदयार्थी हे नेहमी चांगल्या गुणांनी यशस्वी व्हावे व चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळावे असा माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल याचा मानस असतो व त्यासाठी परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या नेहमी मिळणा-या मार्गदर्शनामुळे विदयार्थी हे घवघवीत यश संपादन करत असतात. विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विभागप्रमुख व शिक्षकांचे मोलाचे योगदान मिळत असते.
विध्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, सचिव राजगोपालजी भंडारी, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. व आय एम सी ए विभागप्रमुख डॉ.मनोज बेहेरे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक व एम.एम.एस. विभागप्रमुख डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी कौतुक केले. विध्यार्थ्यांना प्रा. दिनेश बोरसे, डॉ.प्रियंका भंडारी, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. ज्योती गोराणे, प्रा. सपना येशी प्रा. विजेता सोनगिरे व प्रा. पूनम मांडलिक या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले, तसेच रजिस्ट्रार प्रा. सुमित सगळे, डी.यु. चौधरी, विशाल माहेश्वरी, कविता पाटील, निलिमा पाटील, धिरज शेटे, दिपक बोरसे,. किशोर सोनवणे, दिपक दोरीक. सचिन नवले, मिलिंद इंदासराव यांनी अभिनंदन केले.

