उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आर.सी.पटेल आय.एम.आर.डी, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “रोजगार आणि उद्योजकता” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
1 min read

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आर.सी.पटेल आय.एम.आर.डी, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “रोजगार आणि उद्योजकता” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

Loading

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आर.सी.पटेल आय.एम.आर.डी, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “रोजगार आणि उद्योजकता” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
शिरपूर प्रतिनिधी:
(वेदांत माळी)
(गौरव पाटील)

आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “रोजगार आणि उद्योजकता” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले. या कार्यशाळाचा उद्देश विद्यार्थ्यांथी, पालक व नागरिक यांच्यामध्ये उद्योजकता व रोजगार क्षेत्रातील जागृती, ज्ञान व कौशल्ये वृद्धिंगत करणे असा होता.
कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांचे स्वागत तसेच सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक ईडी सेल समन्वयक प्रा .कौस्तुभ सावंत यांनी सादर केले. त्यानंतर कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. यामध्ये , डॉ. एस. जे. सुराणा मॅनॅजमेन्ट कॉउंसिल मेम्बर, क.ब.चौ.उ.म.वि , जळगाव, डॉ. गजानन पाटील सिनेट मेंबर क.ब.चौ.उ.म.वि, जळगाव, डॉ.नविन खंडारे मुख्य कार्यकारी अधिकारी, केसीआयआयएल, क.ब.चौ.उ.म.वि, जळगाव, श्री. कल्पेश देवरे संचालक, दत्तप्रभू अॅग्रो-इंड. प्रा. लि, श्री. उमेश पाटील संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी-कृष्णामाई अमृततुल्य, डॉ .वैशाली पाटील, संचालिका, आर.सी.पटेल आय.एम.आर.डी, शिरपूर यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यशाळेचे उदघाटक डॉ. एस. जे. सुराणा यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणातून विद्यार्थ्यांना रोजगार व उद्योजक त्यांच्यातील समन्वय याबद्दलची माहिती दिली व त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या बदलत्या काळात उद्योजकता व त्याला लागणारे कौशल्य याबद्दल जागृत केले, तसेच स्वत:चे अनुभव, चिकाटी व संघर्षाचे महत्त्व समजावून सांगितले.
प्रथम सत्रात डॉ. नविन खंडारे यांनी बिझनेस आयडिया ते स्टार्टअप यामधील प्रवास कशा रीतीने सुरळीत होईल त्यासाठी लागणारे संसाधने उपलब्ध कुठे होतील याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळात बिझनेस स्टार्टअपला अपेक्षित यश का मिळत नाही किंवा काहीच जण यशस्वी होतात यांच्यामधील दुवा विद्यार्थ्यांना समजून दिला. द्वितीय सत्रात श्री. कल्पेश देवरे यांनी कृषी-आधारित उद्योग व ग्रामीण उद्योजकतेचे महत्त्व पटवून देतांना व विद्यार्थ्यांना ग्रामीण क्षेत्रात संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. तृतीय सत्रात श्री. उमेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर संभाषणातून त्यांच्या जीवनातील प्रवास सांगितला तसेच त्यांनी उद्योगासाठी लागणारी कौशल्य, गुणवत्ता ग्राहकांचे समाधान याबद्दल मार्गदर्शन केले . स्वतःच्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित करत विद्यार्थ्यांना प्रेरित करत भविष्यात कुठल्याही स्वरूपाची मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.

मान्यवरांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न-उत्तरे विचारून त्यावर सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमादरम्यान उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. सदर कार्यशाळेबाबत सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उद्योजकांनी दिलेली अनुभवाची माहिती आमच्या उद्योग व्यवसायाच्या उभारण्यासाठी अनमोल ठरणार आहोत. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींना आव्हान म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला मिळाला त्याबाबत आजच्या मार्गदर्शकांचे व आय.एम.आर.डी परिसंस्थेचे आम्ही आभारी आहोत. या कार्यशाळेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत्रातील १० महाविद्यालयांमधील १७७ विद्यार्थी व ३८ नागरिकांनी सहभाग नोंदविला होता..
सदर कार्यशाळेला परिसंस्थेच्या संचालिका यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. डॉ. वैशाली पाटील, एमसीए व एमसीए (इंटिग्रेटेड) विभाग प्रमुख डॉ.मनोज बेहेरे, आय.क्यु.ए.सी. समन्व्यक डॉ. मनोज पटेल व पदवी विभाग प्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी सक्रिय सहभाग घेतला. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. विजय गर्गे यांनी केले. डॉ. प्रियंका भंडारी, प्रा. छाया पाटील, प्रा. प्रियंका सैंदाणे, डॉ. रूपाली अग्रवाल, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. हर्षल भामरे, प्रा.हर्षदा चौधरी, प्रा. आयेशा पिंजारी, प्रा. श्रेयश पाटील आणि श्री. दिपक दोरीक यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *