महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळात अष्टमी निमित्त सामूहिक महाआरतीचा उत्साह
1 min read

महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळात अष्टमी निमित्त सामूहिक महाआरतीचा उत्साह

Loading

महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळात अष्टमी निमित्त सामूहिक महाआरतीचा उत्साह

अमळनेर प्रतिनिधी –
सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीही महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळ, न्यू प्लॉट यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी अष्टमी निमित्त मंडळातर्फे परिवारासह सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंडळातील महिला सदस्य, ज्येष्ठ सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भक्तिगीतांच्या गजरात, टाळ-झांजांच्या निनादात व “जय माता दी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मंडळातील महिला सदस्यांनी उत्सवाचे नियोजन, सजावट, सांस्कृतिक उपक्रम तसेच आरतीचे आयोजन जबाबदारीने पार पाडले. सामूहिक महाआरतीत सहभागी होण्यासाठी अनेक कुटुंबीयांनी हजेरी लावून नवरात्र उत्सव अधिकच मंगलमय केला.
दरवर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील मंडळाच्या उपक्रमात भक्तिभाव, सामाजिक एकता आणि महिलांच्या सक्रीय सहभागाची झलक दिसून आली. या कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण करण्यात आले.
मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व उपस्थित भाविकांचे आभार मानून भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *