सार्वजनिक धोरण विश्लेषणासाठी राज्यशास्त्र महत्वाचे- सीए नीरजजी अग्रवाल यांचे प्रतिपादन.
![]()
सार्वजनिक धोरण विश्लेषणासाठी राज्यशास्त्र महत्वाचे- सीए नीरजजी अग्रवाल यांचे प्रतिपादन.
अमळनेर प्रतिनिधी- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत),अमळनेर अंतर्गत राज्यशास्त्र विभागाचा स्वागत समारंभ दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 3:30 दरम्यान प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर या ठिकाणी संपन्न झाला.
या स्वागत समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक डॉ.एस डी ओसवाल, पदार्थ विज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.जयंत पटवर्धन,प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे अधिसभा सदस्य डॉ.धीरज वैष्णव,सिनेट सदस्य तथा राज्यशास्त्र विषयाचे डॉ.संदीप नेरकर याचप्रमाणे पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख तथा वसतीगृह प्रमुख डॉ.अमित पाटील यांच्यासह राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.सुनील राजपूत,डॉ.राखी घरटे, डॉ.प्रदीप पवार, प्रा.दिलीप तडवी, डॉ.हर्ष नेतकर यांच्यासह तत्वज्ञान केंद्राच्या डॉ.राधिका पाठक यावेळी उपस्थित होत्या.
प्रारंभी कर्मवीर,दानशूर प्रताप शेठजी, पूज्य साने गुरुजी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर मान्यवरांचे स्वागत गीताच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले, स्वागत गीत कावेरी भोई,डॉ हर्ष नेतकर यांनी सादर केले.
*गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
1.आफ्रिन पठाण (एफ वाय बी ए प्रथम)
2.साक्षी देविदास पाटील
(एस वाय बी ए प्रथम)
3.पाटील मयुरी सुखदेव (बी ए प्रथम)
4.पाटील गायत्री कैलास (बी ए द्वितीय)
5.पाटील भाग्यश्री विठ्ठल (बी ए तृतीय)
6.दानेश सोनार (एम ए वर्गात प्रथम)
7.पाटील रोहिणी विनोद
(एम ए वर्गात द्वितीय)
8.पाटील पल्लवी अशोक
(एम ए वर्गात तृतीय)
9.शुद्धोधन बागुल
(एम ए प्रथम वर्ष-प्रथम)
10.स्वप्नील सुनील अमृतकर
(सेट परीक्षा उत्तीर्ण)
11.निर्भय धनंजय सोनार
(सेट परीक्षा उत्तीर्ण)
उपरोक्त सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी तृप्ती सोनवणे,रमा चव्हाण,राजश्री पाटील,कावेरी भोई आदींनी आपले मनोगत व कौशल्य सादर केले.
स्वागत समारंभ निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना सी ए निरज अग्रवाल म्हणाले की, राज्यशास्त्र विषय म्हणजे व्यवस्थित अभ्यास करणारे एक शास्त्र आहे,अलीकडे राज्यशास्त्र विषयाची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इंडस्ट्री एक्सप्लोजर आणि राजकीय पक्ष यांना सल्ला व सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देण्याचे काम राज्यशास्त्र हा विषय करीत असतो म्हणून या विषयाचे जे तज्ञ अथवा अभ्यासू विद्यार्थी असतात त्यांना एकाप्रकारे एक्स्प्लोजर मिळत असते तसेच राजकीय विश्लेषण व सार्वजनिक धोरणाच्या विश्लेषणासाठी राज्यशास्त्र विषय खूप महत्त्वाचा आहे, गृहीतकांची पडताळणी करणारे शास्त्र म्हणून या विषयाकडे पाहिले जाते. एकूणच विद्यार्थ्यांनी प्रताप कॉलेजचे नाव व राज्यशास्त्र विभागाचे नाव उंच शिखरावर घेऊन जाण्याच्या सदिच्छा यावेळी नीरज अग्रवाल यांनी दिले.
दुसरे अतिथी सेवानिवृत्त प्राध्यापक व सध्या प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक डॉ एस डी ओसवाल यांनी विद्यार्थ्यांना प्रताप तत्वज्ञान केंद्राची सूक्ष्म पद्धतीची माहिती दिली. विद्यार्थी हे नवीन राष्ट्रीय धोरणात दोन पदव्या घेता येऊ शकतात,या संदर्भात देखील डॉ.ओसवाल सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक तथा प्रज्ञावंत आघाडीचे जळगाव जिल्हा प्रमुख डॉ.जयंत पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना नैतिकता,चारित्र्य, शील व एकता या संदर्भाची माहिती दिली आणि या मूल्यांचे अंगीकरण जीवनात केले पाहिजे, अशा अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले.
विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख डॉ.धीरज वैष्णव यांनी प्रताप तत्वज्ञान केंद्राची माहिती विद्यार्थ्यांना दिली.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे या तत्त्वज्ञान केंद्राचे विद्यार्थी होते आणि हा परिसर तत्वज्ञान विषयाचा अभ्यास करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी तत्वज्ञान केंद्रातील ग्रंथ अभ्यासावे, असे आवाहन देखील केले.
प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या मनोगत म्हणाले की, या राष्ट्राचा नेता किती शक्तिशाली व वैचारिक आहे, यावर या देशाचा विकास अवलंबून आहे आणि म्हणून राज्यशास्त्र विषय समाज व देश घडवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,यावेळी प्राचार्य एच डी जाधव यांनी पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना जे बक्षीस मिळाली आहेत त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
स्वागत समारंभाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना
डॉ.विजय तुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,राज्यशास्त्र- राजकारण आणि करिअर हे तीनही वेगवेगळे अभ्यासाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास का केले पाहिजे ? राज्यशास्त्र विषयाची निवड का करावी ? राज्यशास्त्र या विषयात करिअरच्या संधी कशा आहेत ? याबाबतीत सूक्ष्मत्वाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफ्रीन पठाण व रमा चव्हाण यांनी केले तर उद्घाटन पर स्वागत समारंभाचे आभार रवीना नरवाडे या विद्यार्थिनी मानले.
प्रस्तुत समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्रताप तत्वज्ञान केंद्राचे डॉ.एस डी ओसवाल,डॉ.राधिका पाठक,रोहिदास साळुंखे,गोपाळ महाजन,दिपक महाजन,कमलेश बोरसे,बापू पाटील,पंडित नाईक,मंगलाबाई सोनवणे याचप्रमाणे करिअर कौंसेलिंग सेंटरचे दिलीप दादा शिरसाठ, पराग रवींद्र पाटील,विशाल अहिरे,अतुल धनगर,प्रा.अमोल अहिरे,ग्रंथपाल दिपक पाटील यांच्यासह राज्यशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

