महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत उत्कृष्ट सहभाग
1 min read

महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत उत्कृष्ट सहभाग

Loading

महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत उत्कृष्ट सहभाग

अमळनेर प्रतिनिधी : मारवड विकास मंच आणि मिल के चलो असोसिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने आयोजित डॉ. कलाम विज्ञान संशोधन परीक्षा महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव (ता. अमळनेर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परीक्षेत शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ५० गुणांची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक संशोधन आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरली. परीक्षा समन्वयक म्हणून कल्याणी पाटील व वैष्णवी ठाकरे यांनी काम पाहिले.
अमळनेर तालुक्यातील २१ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रवेश घेतला. प्रत्येक शाळेतून तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, २४ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे सन्मान करण्यात येईल.
या वैज्ञानिक आयोजनाला मार्गदर्शन डॉ. संदीप साळुंखे यांचे नेहमी सहकार्य लाभते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ए.जी. महाजन, केंद्र संचालक आय.आर. महाजन, विज्ञान शिक्षक एस.के. महाजन, एच.ओ. माळी आदींचे सहकार्य लाभले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी आणि संशोधनात्मक वृत्ती वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *