अतिवृष्टी-पूरामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त अनुदान मागणी – कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र
1 min read

अतिवृष्टी-पूरामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त अनुदान मागणी – कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

Loading

अतिवृष्टी-पूरामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त अनुदान मागणी – कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

अमळनेर प्रतिनिधी – राज्यातील जून ते सप्टेंबर, 2025 या पावसाळी हंगामाच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीकाच्या नुकसानेकडेता केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर इतर उपाययोजना सह सरसकट अतिरिक्त आर्थिक मदत द्या.अशी मागणी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पूर नैसर्गिक आपत्ती यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना शासनाकडून अनुदान स्वरूपात मदतीबाबतची माहिती प्रचलित दर खालील प्रमाणे
जीरायत शेती 20 मार्च 2014 दोन हेक्टर मर्यादित दहा हजार रुपये तर 27 मार्च 2023 ला दोन हेक्टर मर्यादित 8500
1 जानेवारी 2024 ला 3 हेक्टर मर्यादित 13 हजार 600 तर
30 मे 2025 ला 2 हेक्टर मर्यादित 8500

20 मार्च 2014
बागायती शेती 2 हेक्टर मर्यादित 15 हजार

27 मार्च 2023 दोन हेक्टर मर्यादित बागायती शेती 17 हजार
एक जानेवारी 2024 तीन हेक्टर मर्यादित बागायती शेती 27 हजार तर
30 मे 2025 ला 2 हेक्टर मर्यादित 17 हजार र

बहुवार्षिक फळपिके
20 मार्च 2014 ला 2 हेक्टर मर्यादित 25 हजार
27 मार्च 2023 ला 2 हेक्टर मर्यादित
22 हजार 500 पाचशे

1 जानेवारी 2024 ला 3 हेक्टर मर्यादित
36 हजार

30 मे 2025 ला 2 हेक्टर मर्यादित
22 हजार 500 पाचशे

उपरोक्त विषयांकित संदर्भान्वये मार्च 2014 ते सप्टेंबर 2025 अखेर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांच्या नुकसानिकरीता बाधित शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात दिलेल्या मदतीची तुलनात्मक विचार करता तत्कालीन आघाडी शासनाने संदर्भ क्रमांक एक शासन निर्णय दिनांक 20 मार्च 2024 बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 जिंकण्याचे हेतून एक विशेष बाब म्हणून पॅकेज जाहीर केले होते.
त्यात धर्तीवर महायुती शासनाने संदर्भ क्रमांक तीन शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2024 आनन्वये बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
जिंकण्याचे हेतूने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत अनुदान स्वरूपात प्रदान केली होती
तथापि महायुती शासन सत्तेवर आल्यावर संदर्भ क्रमांक चार शासन निर्णय दिनांक 1 मे 2025 अनन्ये संदर्भ क्रमांक 3 शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2024 अन्वये दिलेल्या सूचना 2 हेक्टर क्षेत्राऐवजी 3 हेक्टर व अनुदान तीन पटीने वाढीव अधिक्रमित करण्यात आलेल्या नसून खरीप 2025 व पुढील कालावधी करिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपीक नुकसानिकरीता द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 प्रमाणे देय राहतील हा अन्यकारक निर्णयातील तुटपुंजी मदतीमुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये शासन प्रति तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
सबब शासन निर्णय दिनांक 30 मे 2025 नुसार खरीप 2025 पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीबाबत शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2024 अनन्ये दिलेल्या सूचना अधिक्रमित करून शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 प्रमाणे देय राहतील या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात जून 2025 ते आगस्ट 2025 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानी पोटी बाधीतांना शासन निर्णय दिनांक 23 सप्टेंबर 2025 नुसार दोन हेक्टर मर्यादित जिरायत शेतीसाठी रुपये 8500 व बागायत शेतीसाठी 17000 आणि बहुवार्षिक फळ पिकासाठी 22500 याप्रमाणे तुटपुंजी मदती ऐवजी विषयाकींत आणखीन संदर्भ क्रमांक तीन शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2024 च्या धरतीवर वरील तक्त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर सरसकट अतिरिक्त मदत अनुदान स्वरूपात प्रदान करण्यात यावे ही हात जोडून विनंती अमळनेरचे कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह उपमुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी कृषी अधिकारी, जिल्हाअधिक्षक,कृषी अधिकारी यांना पत्र लिहिले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *